Deepika Padukone: टाईम मॅगजीनच्या कव्हरवर 'ग्लोबल स्टार' बनली दीपिका | पुढारी

Deepika Padukone: टाईम मॅगजीनच्या कव्हरवर 'ग्लोबल स्टार' बनली दीपिका

पुढारी ऑनलाईन डेस्क : दीपिका पादुकोण बॉलीवूडची प्रसिद्ध कलाकार तर आहेत. (Deepika Padukone) त्याचबरोबर तिने परदेशात भारताची मान उंचावलीय. आता दीपिका टाईम मॅगजीनच्या कव्हर पेजवर झळकलीय. त्यामुळे ग्लोबल स्टारच्या यादीत दीपिकाचे नाव नोंदवले गेले आहे. (Deepika Padukone)

दीपिकाच्या चित्रपट इंडस्ट्रीतील योगदानामुळे ग्लोबल स्टारचे क्रेडिट दिल जातं. २०१८ मध्ये ती १०० सर्वात प्रभावशाली यादीत सहभागी झाली होती. या औचित्याने तिने आपले यश, तिच्याविरोधात येणाऱ्या राजकीय प्रतिक्रिया, मानसिक आरोग्य आणि पती अभिनेता रणवीर सिंह सोबतच्या संबंधांवर उघडपणे बातचीत केली.

दीपिका एक ग्लोबल स्टार झालीय. टाईम मॅगजीनच्या नव्या आवृत्तीत कव्हरवर तिचा फोटो आहे. ज्यामध्ये ती कोट पँट घातलेली दिसते. मुलाखतीत जेव्हा दीपिकाला विचारण्यात आलं की, हॉलीवूड पुन्हा एकदा एन्ट्री करणार आहे, त्यावेळी ती म्हणाली की, ‘माझं मिशन नेहमी आपल्या देशात राहून परदेशात प्रभाव टाकणे राहिलं आहे. मी इथवर पोहोचण्यासाठी कोणताही गेम प्लॅन नव्हता. पण, मी जो विचार केला, त्यात मला अपयश दिसलं नाही.’

Back to top button