Taarak Mehta : जेनिफरने १५ वर्षांनी सोडला शो ; निर्मात्यांवर लैगिक छळाचा आरोप

Taarak Mehta
Taarak Mehta
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : गेल्या काही दिवसांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) या मालिकेतून वेगवेगळ्या कारणांनी कलाकार शो सोडत असल्याचे वृत्त समोर येत आहे. दरम्यान आता मालिकेतील अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बन्सीवालने निर्मात्यावर लैगिंक छळाचा आरोप करत शोमधून बाहेर पडल्याची माहिती दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जेनिफरने निर्माते असित मोदी, प्रोजेक्ट हेड सोहेल रमाणी आणि कार्यकारी निर्माता जतिन बजाज यांच्याविरुद्ध कामाच्या ठिकाणी लैंगिक गैरवर्तनाची तक्रार दाखल केली आहे. जेनिफरने गेल्या दोन महिन्यापासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' ( Taarak Mehta Ka Ooltah Chashmah ) शोच शूटिंग केलेले नाही. तिने शेवटचे ७ मार्च रोजी शेवटचे शूटिंग केले होतं.

याबाबत बोलताना जेनिफर म्हणाली की, 'माझ्या लग्नाचा वाढदिवस आणि होळी असल्याने मला लवकर घरी जायचे होते. यामुळे मी अर्धा दिवस सुट्टी मागितली होती. जाण्याच्या आधी मी निर्मात्यांशी याबाबत बोलले होते. दरम्यान माझ्या मुलीली एकत्रित होळी साजरी करायची होती मात्र, मला निर्मात्यांनी सुट्टी दिली नाही. दरम्यान सोहिल यांनी मला चार वेळा सेटवरून जाण्यास सांगितले आणि कार्यकारी निर्मात्याने माझ्या कारमागे उभे राहून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला आणि मला सेटवरून जावू दिले नाही. मी १५ वर्ष या शोचा भाग बनले आहे. सेट सोडून जाताना मला धमकावले गेले. यामुळे मी असित मोदी, सोहील रमाणी आणि जतिन बजाज यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.'

'ही घटना ७ मार्च रोजी घडली असून सीसीटिव्हीमध्ये कैद झाली आहे. ७ मार्चनंतर मला वाटलं की, निर्माते फोन वरून संपर्क साधतील. परंतु, २४ मार्च रोजी सोहिलने मला थेट नोटीस पाठवत मी शोमधून बाहेर पडल्याचे सांगितले. शिवाय माझे मानधन देणार नसल्याचे सागितले. यानंतर अथक प्रयत्न करून माझे मानधन काढून घेतले. आणि त्यांना नोटीस पाठवून गैरवर्तणूक केल्याबद्दल माफी मागावी असे सांगितले. आतापर्यत अजूनही त्यांनी याचे उत्तर दिलेले नाही. याप्रकरणाचा पोलिस पुढील तपास करतील,' असेही तिने म्हटलं आहे.

हेही वाचा ; 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news