पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने ( Alia Bhatt ) तिच्या फिल्मी करिअरमध्ये एकापेक्षा एक हिट चित्रपटात भारदस्त भूमिका साकारल्यात. आलियाने तिच्या दमदार अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली. आता आलियाने तिच्या फिल्मी करिअरबद्दल खुलासा करत घराणेशाहीच्या मुद्द्यावर ( नेपोटिझम) भाष्य केले आहे.
आलियाने ( Alia Bhatt ) फिल्मी इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही प्रचंलित असल्याचे मान्य करत सांगितले आहे की, 'बॉलिवूडमध्ये घराणेशाही आहे, परंतु, मी कधीही माझे काम हलक्यात घेतले नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी घराणेशाहीबद्दलचे अनेक प्रश्न उपस्थित होताना पाहिले आहेत. या मुद्द्यावर अनेकांची अनेकवेळा चौकशी केली जाते.'
यापुढे आलिया म्हणाली की, 'सामान्य लोकांच्या तुलनेत कलाकारांच्या मुलांना लवकर आणि चांगली संधी मिळते हे खरे आहे. यामुळे स्टार्सकिडसची चांगली सुरूवात होते. परंतु, पुढे जावून १०० टक्के देण्याची त्याची- त्याची जबाबदारी असते. दरम्यान कोणतेही काम मोठे किंवा लहान नसते. मी माझा करिअरमध्ये कोणतेही प्रश्न उपस्थित न करता सतत काम करत असते. यामुळे कदाचित मी या उंचीपर्यत पोहोचू शकले. कोणतेही काम सोपे नसून खूपच अडचणींचा सामना करावा लागतो.'
यावरून आलियाने फिल्मी इंडस्ट्रीमध्ये घराणेशाही असल्याचे सांगत खूपच मेहनत करावी लागत असल्याचे म्हटलं आहे. याआधीही आलिया घराणेशाहीच्या मुद्दावर तिने प्रतिक्रिया दिली होती. आलिया लवकरच करण जोहरच्या 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात आलियासोबत रणवीर सिंग मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २८ जुलै २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. यासोबत आलिया फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या चित्रपटात प्रियांका चोप्रा आणि कॅटरिना कैफसोबत दिसणार आहे.
हेही वाचा :