पुढारी ऑनलाईन डेस्क : परिणीती चोप्रा (Parineeti Chopra ) आणि राघव चढ्ढा वेळोवेळी कॅमेराबद्ध झाल्यानंतर दोघांच्या लग्नाची चर्चा सुरू झाली. दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, रविवारी दोघेही डिनर डेटसाठी बाहेर गेले होते आणि मुंबईत स्पॉट झाले होते. त्यांनी अद्याप त्यांच्या रिलेशनची अधिकृतपणे माहिती दिली नसली तरी दोघे डेटिंग करत असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान, दोघेही पुन्हा एकदा स्पॉट झाले असून परिणीतीच्या हातात अंगठी दिसली. त्यामुळे कयास लावला जात आहे की, ही एंगेजमेंट रिंग तर नाही ना? (Parineeti Chopra )
माहितीनुसार, परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा १३ मे रोजी दिल्लीत साखरपुडा करत आहेत. मात्र, या खास सोहळ्यापूर्वी तिची एंगेजमेंट रिंग चर्चेत आली. एक सुंदर अंगठी तिने हातात घातल्य़ाचे समोर आले.
या वर्षी ऑक्टोबरच्या अखेरीस ते लग्न करू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.