Met Gala : पापराझींनी रेड कार्पेटवर आलियाला ऐश्वर्या समजलं अन्...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ने यंदाच्या २०२३ मधील मेट गाला सोहळ्यात डेब्यू केला. (Met Gala ) हा सोहळा न्यू-यॉर्क शहरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी पर्ल गाऊन घालून आलिया रेड कार्पेटवर उतरली. पण, कॅमेरापर्सननी तिला ऐश्वर्या राय समजले. काहींनी तर तिला ऐश्वर्या म्हणून हाक मारली. असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे. (Met Gala )
राझी फेम आलियाने हजारो लोकांचे लक्ष आपल्याकडे वळून घेतले. आलियाने मोत्यांनी सजवलेला व्हाईट कलरचा फ्लोरल टच गाऊन परिधान केला केला होता. आलियाने प्रबल गुरुंगच्या कलेक्शनमधील billowing silhouette एक व्हाईट लॉन्ग गाऊन निवडला होता. मेट गालाच्या रेड कार्पेटवर पोज दिल्यानंतर आलियाने इन्स्टाग्रामवर मेट गाला लूकचे काही फोटो शेअर केले आणि लिहिले की, तिचा हा शाही पोशाख एक लाख मोत्यांनी बनवलेला आहे.
“मेट गाला…Karl Lagerfeld: A Line of Beauty… मला या प्रतिष्ठित चॅनेल ब्राईड्सने नेहमी आकर्षक बनवलं आहे. प्रत्येक सीझनवेळी कार्ल लेगरफेल्डची प्रतिभा आणि नव्या आश्चर्यजनक पोशाखात मी चमकले. माझा ड्रेस supermodel Claudia Schiffer’s च्या १९९२ च्या चॅनल ब्राईडशी प्रेरित होता. एम्ब्राॅयडरीसह १ लाख मोत्यांनी सजवलेला हा आऊटफिट होता. पहिल्या भेटीत तुम्ही माझ्यासाठी इतका चांगला पोशाख निवडला, मला अभिमान वाटत आहे.
- NHRC च्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी ‘चिरभोग’ ला पहिले पारितोषिक
- सोनालीची प्रिंटेड साडी…हॉट ब्लाऊज लय भारी
- ऋतुजा शिंदेचे ‘हे’ ब्लॅक अॅन्ड व्हाईट फोटो पाहिलेत का?
Alia Bhatt gets mistaken for Aishwarya Rai Bachchan by paps at Met Gala 2023
Read @ANI Story | https://t.co/ylqozwhyxp#AliaBhatt #MetGala2023 pic.twitter.com/cUPAuIjxXQ
— ANI Digital (@ani_digital) May 3, 2023