NHRC च्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी 'चिरभोग' ला पहिले पारितोषिक | पुढारी

NHRC च्या ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत मराठी 'चिरभोग' ला पहिले पारितोषिक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नॅशनल ह्यूमन राइट्सच्या ( NHRC ) ८ व्या शॉर्ट फिल्म स्पर्धेत ‘चिरभोग’ला २ लाखांचे प्रथम पारितोषिक मिळाले. तर आसामी भाषेमधील ‘सक्षम’ ( Enabled ) आणि तमिळ भाषेमधील ‘अचम थानवीर’ ( Atcham Thanvir ) ला अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय पारितोषिक मिळाले. या स्पर्धेत ‘सक्षम’ला दिड लाखांचे आणि ‘अचम थानवीर’ रु. एक लाखाचे पारितोषिक मिळाले.

नीलेश आंबेकर यांचा ‘चिरभोग’ शॉर्ट फिल्म एका मुलाच्या जीवनावर आधरित आहे. यात सतत होणारा भेदभाव आणि स्वातंत्र्य, समानता, सन्मान आणि हक्क सुनिश्चित करण्यासाठीचा त्याचा संघर्षमय प्रवास दाखविण्यात आला आहे. भवानी डोले टाहू यांच्या ‘सक्षम’ मध्ये एका दिव्यांग मुलाच्या जीनवनातील संघर्ष दाखवण्यात आला आहे. यात दिव्यांगाची मानसिकता आणि पालकांकडून त्यांच्या संगोपनात होणारे भेदभाव दाखवले आहेत. तर टी. कुमार यांच्या ‘अचम थानवीर’ या शॉर्ट फिल्ममध्ये कोणत्याही अनुचित प्रकार आणि लैंगिक छळाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठीता प्रबोधन करणारी कथा मांडली आहे.

‘सर्टिफिकेट ऑफ स्पेशल मेन्शन’ साठी निवडलेल्या तीन चित्रपटांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पुरस्कार देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. या श्रेणीत राजदत्त रेवणकर लिखित ‘Lost of progress’, अब्दुल रशीद भट यांचा ‘Don’t Burn Leaves’, हरिल शुक्ला यांच्या ‘यू-टर्न’ या चित्रपटाचा समावेश आहे.

संबंधित बातम्या

नॅशनल ह्यूमन राइट्सचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांच्या, डॉ. ज्ञानेश्वर एम. मुळे आणि राजीव जैन यांनी पुरस्कारप्राप्त चित्रपटांची निवड केली आहे.

हेही वाचा : 

Back to top button