Vivek Agnihotri: फिल्मफेयर ॲवॉर्डवरून विवेक अग्निहोत्रींनी काढली भडास | पुढारी

Vivek Agnihotri: फिल्मफेयर ॲवॉर्डवरून विवेक अग्निहोत्रींनी काढली भडास

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री फिल्म फेअर ॲवॉर्डनंतर संताप व्यक्त केला आहे. एक मोठी पोस्ट लिहून ॲवॉर्ड शो विषयी सांगितले आहे. ज्यामुळे सर्वांचे लक्ष या पोस्टकडे वेधले गेले आहे. (Vivek Agnihotri) “द कश्मीर फाईल्स” दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून फिल्मफेअर ॲवॉर्डवर निशाणा साधला त्याचबरोबर बॉयकॉट करण्याचा सल्ला

दिला. अग्निहोत्री यांनी ऑफिशियल ट्विटर हँडलवर सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठीचा फिल्मफेअर ॲवॉर्ड नॉमिनेशनची एक पोस्ट शेअर केली. त्याचबरोबर त्य़ांनी चित्रपट इंडस्ट्रीच्य़ा ॲवॉर्ड शोजवरदेखील भडास काढली. (Vivek Agnihotri)

ट्विट करून काढली भडास

विवेक अग्निहोत्री यांनी लिहिलं – “ मला मीडियाकडून समजलं की, द कश्मीर फाईल्सला ६८ व्या फिल्मफेअर ॲवॉर्ड्ससाठी ७ कॅटेगरीमध्ये नॉमिनेट करण्यात आलं आहे. पण मी नम्रपणे या पुरस्कारांचा भाग बनण्यास नकार देतो.

दरम्यान, ‘द कश्मीर फाईल्स’ला एकदेखील ॲवॉर्ड मिळाला नाही, तेव्हा अभिनेते अनुपम खेर यांनी एक ट्विट केले. त्यांनी ट्विटरवर एक पोस्ट शेअर केलीय. अनुपमने लिहिलं, ‘आदर एक महाग भेट आहे. त्याची अपेक्षा स्वस्त लोकांकडून ठेवू नका.’

Back to top button