‘बधाई दो’ला फिल्मफेअर; अपेक्षा पोरवालने केले कौतुक | पुढारी

'बधाई दो'ला फिल्मफेअर; अपेक्षा पोरवालने केले कौतुक

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतेच ६८ व्या फिल्मफेअर पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. अनेक दिग्गज कलाकारांच्या उपस्थितीत हा खास सोहळा पार पडला. राजकुमार राव आणि भूमी पेडणेकर यांच्या ‘बधाई दो’ ने फिल्मफेअरमध्ये अनेक पुरस्कार पटकावले. चित्रपटातील कोमल, सुमीचे (भूमी पेडणेकर) पहिले प्रेम ही व्यक्तिरेखा साकारणारी अपेक्षा पोरवाल हिने संपूर्ण टीमचे अभिनंदन करून एक खास मेसेज शेअर केला.

अपेक्षा पोरवाल
अपेक्षा पोरवाल

अभिनेत्री अपेक्षा म्हणते, ” फिल्मफेअरमध्ये अनेक पुरस्कार मिळवल्याबद्दल टीम ‘बधाई दो’चे खूप खूप अभिनंदन. या चित्रपटाचा एक छोटासा भाग असल्याबद्दल मी खूप आभारी आहे. हा एक संदेश देऊन जाणारा चित्रपट आहे जो LGBTQI ची एक सुंदर कथा मांडतो.”

ती पुढे पुढे म्हणते, “समलिंगी विवाह विधेयकावर SC मध्ये सध्या सुरू असलेले खटले पाहता, मला आशा आहे की हा चित्रपट नक्कीच समीक्षकांना सोबत प्रेक्षकांना सुद्धा काहीतरी छान संदेश देऊन जातो. अपेक्षा पोरवाल सध्या स्लेव्ह मार्केट या इंग्रजी-अरबी वेब सीरिजचे नेतृत्व करणारी पहिली भारतीय म्हणून परदेशात चर्चेत आहे.

Back to top button