पुढारी ऑनलाईन डेस्क : जिया खान मृत्यू प्रकरणी सूरज पांचोलीची निर्दोष सुटका झाल्यानंतर जियाची आई राबिया खान भावूक झाली. याप्रकरणी त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर निराशा व्यक्त केली. यावेळी राबिया यांनी ही केस हायकोर्टात नेणार असल्याचे सांगितले. जिया खान प्रकरणाचा निकाल सीबीआय कोर्टाने तब्बल १० वर्षानंतर दिला. राबिया खान द्वारा कोर्टात सादर केलेल्या पुराव्यांअभावी न्यायालयाने सूरजला निर्दोष ठरवले.
अभिनेते सूरज पांचोली आणि त्याच्या परिवाराला दिलासा मिळाला तर दुसरीकडे जिया खानची आई राबिया खानने मीडिया बातचीत करताना निराशा व्यक्त केली. यावेळी त्यांनी ही केस हायकोर्टात नेणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर त्यांनी ही एक मर्डर केस असल्याचे सांगितले.
राबिया खान म्हणाल्या-"मला एक सांगायचे आहे की, तिला जीवन संपवण्यासाठी प्रवृत्त केल्याचे आरोप फेटाळण्यात आले. माझा हा प्रश्न आहे की, माझी जिया कशी गेली? ही एक मर्डर केस आहे. मी यासाठी हायकोर्टात जाईन.