

गूगलच्या ( Google ) जीमेल ( Gmail Outage ) सेवा बंद झाल्यामुळे हॅशटॅग जी मेल डाऊन (#GmailDown) सध्या ट्विटरवर ट्रेंडमध्ये आहे. अनेक वापरकर्त्यांना या तांत्रिक बिघाडाचा सामना करावा लागत असून त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या आठवड्यात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकलाही अशाच प्रकारच्या तांत्रिक बिघाडाचा त्रास सहन करावा लागला. ४ ऑक्टोबरच्या रात्री फेसबुकसह इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप ८ तास बंद होते.
GMAIL भारताच्या काही भागात काम करत नसल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे लोक ईमेल पाठवू शकत नाहीत. डाऊन डिटेक्टरच्या मते, 68 टक्के वापरकर्त्यांनी नोंदवले की त्यांना वेबसाइटसह समस्या येत आहेत. तर 18 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शनची सूचना नोंद केली आहे. त्याच वेळी, 14 टक्के लोकांनी लॉगिनमध्ये समस्या असल्याचे म्हटले आहे.
भारताबरोबरच इतर काही देशांच्या युजर्सनीही ट्विटरवर अशा तक्रारी केल्या आहेत. GMAIL लॉगिन आणि ईमेल पाठवताना त्यांना समस्या येत आहे. अनेक वापरकर्ते GMAIL सेवा बंद ( Gmail Outage ) असल्याबद्दल प्रतिक्रिया देत आहेत. मात्र, गुगलने यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
आठवड्यापूर्वी फेसबुक बंद पडले होते. त्यानंतर त्यांनी माफीही मागितली. आठवड्याच्या सुरुवातीला जेव्हा फेसबुक बंद पडले तेव्हा फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम बंद पडले. आऊटेजची समस्या कित्येक तासांनंतरही कायम राहिली, अशा परिस्थितीत लोक संदेश पाठवू किंवा प्राप्त करू शकले नाहीत.
काही लोकांना अॅप वापरण्यात अडचण येत आहे. याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. लवकरच ही समस्या दूर होईल. त्याचवेळी, सोशल मीडियावर व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या निवेदनात म्हटले. आम्हाला माहित आहे की, यावेळी काही लोकांना अडचणी येत आहेत. आपल्या संयमाबद्दल आभार मानतो. मात्र, 5 दिवसातच फेसबुकला दुसऱ्यांदा आउटेजला सामोरे जावे लागले.
5 ऑक्टोबर रोजी 7 कोटी नवे युजर्स टेलिग्राम अॅपमध्ये सामील झाले. टेलिग्रामच्या या प्रचंड यशामागे फेसबुक आउटेज ( Facebook Outage ) हे मुख्य कारण होते. वास्तविक, त्याच दिवशी संध्याकाळी फेसबुकसह व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्राम ठप्प झाले होते. जे 6 तासांहून अधिक काळ बंद राहिले. सोशल मीडियाचे हे लोकप्रिय प्लॅटफॉर्म बंद झाल्याने टेलिग्रामला याचा फायदा झाला.