coal crisis : कोळसा संकटात रेल्वे 'ॲक्शन मोड'मध्ये | पुढारी

coal crisis : कोळसा संकटात रेल्वे 'ॲक्शन मोड'मध्ये

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा

देशातील वीज निर्मिती केंद्रांमध्ये अखंडितरित्या कोळसा पुरवठा करण्यासाठी ( coal crisis ) रेल्वे विभागाकडे व्हॅगन आणि रॅकची कमतरता नाही. सध्यस्थितीत रेल्वेकडे ८५० रॅक आहेत. कोळसा आणि उर्जा मंत्रालयाकडून कोळसा वाहतूक करण्यासाठी जेवढ्याही रॅकची मागणी केली जात आहे तेवढे पुरवले जात आहेत, अशी माहिती रेल्वे विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.

रेल्वेकडून दररोज ४३५ रॅकच्या सहाय्याने ४ हजार टन कोळश्याची वाहतूक केली जात आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांपूर्वी मालगाडीचा असलेला सरासरी वेग २४ वरून ४६ किलोमीटर ताशी पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, रेल्वेने लोड होणाऱ्या रॅकची संख्या सोमवारी ४३० वरून ४४० ते ४५० पर्यंत केली आहे.

सोमवारी दिवसभरात १.७७ दशलक्ष टन कोळश्याची वाहतूक करण्यात आली. ( coal crisis ) दैनंदिन कोळश्याची मागणी ५०० रॅक पर्यंत वाढली, तरी रेल्वे हे आव्हान पेलण्यास समर्थ असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. देशातील पूर्व भागात कोळसा क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात कोळसा येत आहे. अशात पूर्व मध्य रेल्वेकडून सेवा दिली जात आहे, असेही अधिकार्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कोळसाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना विशेष प्राधान्य

देशातील वीज निर्मिती केंद्र सध्या कोळसाच्या तुटवड्याचा सामना करीत आहेत. अशात या केंद्रांमध्ये कोळसा पोहोचवण्याची जबाबदारी रेल्वे विभागाने उचलली आहे. कोळसाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्यांना विशेष प्राधान्य देण्यात येत आहे. कोळसा घेवून जाणाऱ्या मालगाडीच्या मार्गात कुठलाही अडथळा येणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश रेल्वे बोर्डाकडून देण्यात आले आहेत.
प्रत्येक तासाची माहिती एकत्रित करण्याचे निर्देश

लवकरात लवकर वीज निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा पोहचवण्यासाठी या ट्रेनवर विशेष लक्ष दिले जात आहे. प्रत्येक तासाची माहिती एकत्रित करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबतच दररोज लोड होणाऱ्या कोळशाचे प्रमाण देखील वाढवण्यात आल्याचे रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. उर्जा तसेच कोळसा मंत्रालयाच्या चर्चे दरम्यान कोळसा परिवहन क्षमतेत कुठलाही अडथळा होणार नाही, असे आश्वासन रेल्वेकडून देण्यात आले आहे. वीज निर्मिती केंद्राच्या आवश्यकतेनूसार परिवहन करण्याची विभागाची तयारी असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सर्व विभागीय रेल्वे प्रमुखांना एक नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देश

कोळशाच्या तुटवड्याच्या संकटाला रेल्वेने अंतर्गत आपात्काल मानला आहे.यामुळे पावर प्लांटला कोळसा पुरवण्यासाठी २४ तास कोळशाची परिवहन करणाऱ्या मालगाड्या संचालित केल्या जात आहे. राष्ट्रीय ट्रान्सपोर्टसने देखील कोळशाच्या तुटवड्याला आपत्काल घोषित केले आहे. सर्व विभागीय रेल्वे प्रमुखांना एक नियंत्रण कक्ष तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोबत जनरल मॅनेजर्स तसेच मंत्रालयातील अधिकाऱ्यांना दर एका तासांचे बुलेटिन बनवण्याचे निर्देश देण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचलं का ?

 

 

 

Back to top button