Monalisa Bagal : नवरात्रीच्या रंगात रंगली ग्लॅमरस मोनालिसा - पुढारी

Monalisa Bagal : नवरात्रीच्या रंगात रंगली ग्लॅमरस मोनालिसा

पुढारी ऑनलाईन :

मराठमोळी अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa) हिने नवरात्रौत्सव काळात रोज नवनव्या रंगाचे कपडे परिधान करत आहे. नवरात्रीत ९ दिवस ९ रंगाचे विविध पोषाख परिधान करायचं तिने ठरवलं केला आहे. याचे काही फोटो तिने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून मोनालिसा बागल (Monalisa) हिने फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

पिवळ्या रंगाच्या पेहरावात ती अतिशय सुंदर दिसत आहेत. तितकीच ग्लॅमरस ती अन्य फोटोंमध्ये दिसतेय. तिने हा फोटो शेअर करत लिहिलीय…’Happiness And Brightness…’

हिरव्या रंगाची साडी नेसून तिने फोटोला कॅप्शन लिहिलीय- New Beginnings And Growth. तर करड्या रंगाच्या ड्रेसमधील फोटोला तिने Zeal And Determination… अशी कॅप्शन लिहिली आहे. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसला तिने ‘Purity and Peace..’ अशी कॅप्शन लिहिलीय.

दरम्यान, तिचा गस्त हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती. तसेच सैराट फेम तानाजी गालगुंडे मुख्य भूमिकेत होता. तसेच ती रावरंभा या चित्रपटात दिसणार आहे. चित्रपटाची पटकथा संवाद लेखन प्रताप दादा गंगावणे यांचे आहेत. तर अनुप जगदाळे हे दिग्दर्शकाची भूमिका पार पाडणार आहेत.

तिने ‘झाला बोभाटा’, ‘परफ्यूम’, ‘ड्राय डे’, प्रेम संकट’, ‘गस्त’ ,यासारख्या चित्रपटांत अभिनय केलाय. अल्पावधीतचं तिने स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण केली आहे.

सर्व Photo – monalisabagal insta वरून साभार  

Back to top button