राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपच्या ओबीसी खासदारांची संसद प्रांगणात निदर्शने | पुढारी

राहुल गांधी यांनी माफी मागावी, भाजपच्या ओबीसी खासदारांची संसद प्रांगणात निदर्शने

नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा – भारतीय जनता पक्षातील ओबीसी खासदारांनी मंगळवारी संसद भवन प्रांगणातील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने केली. मोदी आडनावावरुन आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, अदानी प्रकरण आणि अन्य मुद्द्यांवरून काँग्रेसच्या खासदारांनी काळे कपडे घालून सरकारचा निषेध केला.

संसदेचे कामकाज बाधित…

राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यापासून काँग्रेस आक्रमक झाली आहे. संसद आणि संसदेबाहेरील आंदोलन तीव्र करण्याबरोबरच देशाच्या विविध भागात पत्रकार परिषदा घेत पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. दरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांनी घातलेल्या गदारोळामुळे संसदेचे मंगळवारचे कामकाज पूर्णपणे वाया गेले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामकाजाला सुरुवात होऊन दहापेक्षा जास्त दिवस झाले आहेत. मात्र गदारोळामुळे एकही दिवस सुरळीतपणे काम होऊ शकलेले नाही.

Back to top button