पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू (Taapsee Pannu) हिने मुंबईत नुकत्याच झालेल्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये लाल रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान केला होता. त्याचबरोबर त्यावर देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेला नेकलेस घातला होता. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करत तिच्याविरुद्ध मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. शहर हिंद रक्षक संघटनेचे सदस्य आणि भाजप आमदार मालिनी गौर यांचे पुत्र एकलव्य सिंह गौर यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
या तक्रारीत गौरने म्हटले आहे की, तापसी पन्नूने (Taapsee Pannu) १४ मार्च २०२३ रोजी तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. यामध्ये तिने लाल रंगाचा डीप नेक ड्रेस परिधान करून त्यावर देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेला नेकलेस घातल्याचे दिसून येत आहे. यामुळे देवी देवतांचा अवमान झाला आहे. त्यामुळे तिच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
इंदूरच्या छत्रीपुरा पोलिसांनी सांगितले की, आम्हाला एकलव्य गौरकडून तक्रार प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये तापसी पन्नूने देवी लक्ष्मीची प्रतिमा असलेला नेकलेस घालून धार्मिक भावना दुखावल्याचा आणि सनातन धर्माची प्रतिमा खराब केल्याचा आरोप केला आहे. 12 मार्चरोजी मुंबईतील लॅक्मे फॅशन वीकमध्ये तिने हा नेकलेस घातला होता.
दरम्यान, तापसी पन्नूने या ड्रेसमधील तिचा फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यावर तिला खूप ट्रोल करण्यात येत आहे. तापसी पन्नूने कॅप्शनमध्ये लिहिले की, "हा लाल रंग मला कधी सोडेल." या फोटोवर अनेक यूजर्सनी अभिनेत्रीवर देवी लक्ष्मीचा अपमान केल्याचा आरोप केला आहे.
हेही वाचा