RRR Oscar : ऑस्करसाठी ८० कोटींचा खर्च?; एसएस राजामौलींचा मुलगा काय म्हणतो…

RRR Oscar
RRR Oscar

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'आरआरआर' चित्रपटाने ऑस्कर ( RRR Oscar ) जिंकून इतिहास रचला. या चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट पुरस्कार मिळाला. या विजयानंतर सोशल मीडियावर आरआरआरच्या टीमने ऑस्करसाठी ८० कोटी रुपये खर्च केल्याची अफवा पसरली होती. या अफवाचे खंडन करत एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय याने पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे.

एसएस राजामौली यांचा मुलगा कार्तिकेय नुकतेच एका वेबसाईटला याबाबतची माहिती देताना सांगितले की, 'आरआरच्या टीमने ऑस्करसाठी खूप पैसा खर्च केल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली आहे, ही कशी पसरली मला कळत नाही. आम्ही प्रसिद्धीच्या बजेटनुसार खर्च केला. आम्ही सर्व काही नियोजनानुसार केले आहे.'

'आम्ही पैसे दिले असते तर ऑस्कर विकत घेऊ शकलो असतो. ९५ वर्षांचा प्रदीर्घ इतिहास असलेली ही संस्था आहे. तिथे सर्व काही एका प्रक्रियेनुसार घडते. आपण चाहत्यांचे प्रेम विकत घेऊ शकत नाही. जर विकत घ्यायचे असेल तर मग स्टीव्हन स्पीलबर्ग आणि जेम्स कॅमेरॉन यांचे शब्द कसे विकत घ्यायचे हा प्रश्न आहे. आम्हच्यावर चाहत्याचे भरभरून प्रेम आहे.' असेही त्याने म्हटलं आहे.

'ज्युनियर एनटीआर, राम चरण, प्रेम रक्षित, राहुल सिपलीगंज आणि काल भैरव यांना ऑस्कर समितीने आमंत्रित केले होते. नामांकनांमध्ये एमएम किरवानी आणि चंद्र बोस यांचा समावेश होता. याशिवाय ज्यांना समितीने आमंत्रित केले आहे. त्यांना ऑस्करची तिकिटे खरेदी करावी लागली होती. ऑस्कर कमिटीने ई-मेल पाठवला आणि आम्ही सर्व माहिती तपासल्यानंतर परत ईमेल केला. यानंतर परत त्यांनी ईमेल करत प्रत्येक प्रवास तिकीट आकारण्यात आले. ते आम्ही भरले आणि ऑस्करसाठी जाण्याची तयारी केली.' असेही त्याने यावेळी सांगितले. ( RRR Oscar )

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news