रणबीर कपूरचा फिटनेस मंत्रा; अडीच वर्षे 'नो चपाती'; असे करतो रूटीन फॉलो | पुढारी

रणबीर कपूरचा फिटनेस मंत्रा; अडीच वर्षे 'नो चपाती'; असे करतो रूटीन फॉलो

पुढारी ऑनलाईन ; चित्रपटातील कलाकार हे त्‍यांच्या फिटनेससाठी जागरूक असतात. ते नेहमी आहार, व्यायाम यासाठी सतर्क असतात. त्‍यामुळे त्‍यांचे व्यक्‍तीमत्‍व हे उठावदार दिसत असते. चित्रपट क्षेत्रातील कलावंतांसाठी फिटनेस हा खूप महत्‍वाचा असतो. सध्या बोलायचे झाले तर रणबीर कपूरचा श्रद्धा कपूर सोबतचा तू झूठी मै मक्‍कार हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये त्‍याची पिळदार शरीरयष्‍टी पाहून त्‍याचे चाहते भारावून गेले. रणबीर आगामी ॲनिमल चित्रपटातील आपल्‍या लूक्‍स आणि फिटनेसने आपल्‍या चाहत्‍यांना सुखद धक्‍का देणार असल्‍याचे बोलले जात आहे.

आगामी चित्रपट ॲनिमलसाठी रणबीर कपूरने अशीच पिळदार शरीरयष्‍टी बनवली आहे. यासाठी तो खूप मेहनत घेत असून, त्‍यासाठी तो खास डाएटही फॉलो करत आहे. त्‍याचा फिटनेस सर्वांना आकर्शित करत आहे. रणबीरने आपल्‍या ट्रांन्सफॉर्मेशनसाठी खूप मेहनत घेतली आहे. त्‍याने आपल्‍या कॅलरी इनटेक घटवल्‍या आणि फिजिकल ॲक्‍टिवव्हिटी वाढविली जेणेकरून बॉडी फॅट कमी करता येईल. मसल स्‍ट्रेंन्थ वाढविण्यासाठी तो रेजिस्‍टेंस ट्रेनिंग आणि कार्डियो करतो. व्यायामासोबतच योग्‍य आहार घेणे हे त्‍याचे फिटनेसचे गुपीत आहे.

रणबीरचा फिटनेस ट्रेनर शिवोहमने सांगितले की, रणबीर तेल आणि मसाल्‍याचे पदार्थ खाण्यापासून दूर राहतो. तो आपला डाएट इतका फॉलो करतो की, गेल्‍या अडीच वर्षात त्‍याने गव्हाची चपाती खाल्‍लेली नाही. तो एक वेगळा डाएट फॉलो करतो. ज्‍यामध्ये गव्हाच्या रोटीचा समावेश नाही. तो लो-कार्बो डाएट फॉलो करतो. ज्‍यात अंडे, ब्राउन राइस, भाज्‍या, डाळी, प्रोटीन शेक यांचा समावेश आहे.

हेही वाचा : 

Back to top button