Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अडचणीत वाढ; आतंराराष्ट्रीय न्यायालयाने बजावले अटक वॉरंट | पुढारी

Vladimir Putin : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या अडचणीत वाढ; आतंराराष्ट्रीय न्यायालयाने बजावले अटक वॉरंट

नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : युक्रेनसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. मुलांच्या हक्कांच्या बाबतीत जागतिक न्यायालयाने पुतिन यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. शुक्रवारी याबाबत माहिती देताना आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) सांगितले की, युक्रेनियन मुलांना बेकायदेशीरपणे हद्दपार केल्याप्रकरणी ही अटक वॉरंट बजावण्यात आली आहे. (Vladimir Putin)

रशियाच्या बाल हक्क आयुक्त मारिया लव्होवा – बेलोवा यांच्याविरुद्धही अशाच आरोपाखाली अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. दुसरीकडे, मॉस्को नेहमीच हे आरोप फेटाळत आले आहे. पण अटक वॉरंटवर त्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनमधील युद्ध गुन्ह्यांसाठी न्यायालयाने पुतीन यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले आहे. (Vladimir Putin)

काय म्हणाले आयसीसी ? (Vladimir Putin)

रशिया आयसीसीचा सदस्य नाही. अशा स्थितीत पुतिन यांच्याविरुद्ध वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे नियोजन न्यायालयाने कसे केले, याबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, पुतिन हे लोकांना, विशेषत: मुलांना बेकायदेशीरपणे हद्दपार करण्यासाठी आणि युक्रेनच्या ताब्यातील प्रदेशातून रशियन फेडरेशनमध्ये बेकायदेशीरपणे स्थानांतरित करण्यासाठी जबाबदार असल्याचे आढळले आहे. हा गुन्हा 24 फेब्रुवारी 2022 पासून म्हणजेच युद्ध सुरू झाल्यापासूनचा असल्याचे आयसीसीने म्हटले आहे.

चीनचे राष्ट्राध्यक्ष रशियाला भेट देणार आहेत

ही बातमी अशा वेळी समोर आली आहे जेव्हा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग तीन दिवसांनंतर म्हणजेच 20 मार्चला दोन दिवसांसाठी रशियाला भेट देणार आहेत. यादरम्यान ते युक्रेनसोबतचे युद्ध संपवण्याबाबत पुतिन यांच्याशी चर्चा करू शकतात.

अधिक वाचा : 

Back to top button