

पुढारी ऑनलाइन डेस्क : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) तोशाखाना प्रकरणाच्या सुनावणीच्या संदर्भात इस्लामाबादला जात असताना त्यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाला, असे वृत्त पाकिस्तानच्या माध्यमांनी दिले आहे. एएनआयने याबाबतचे ट्विट केले आहे. त्यानंतर इम्रान खान यांनी ट्विट केले आहे आणि आपल्याला अटक करण्यासाठी हे कृत्य करण्यात आले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
इम्रान (Imran Khan) यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "आता हे स्पष्ट झाले आहे की, माझ्या सर्व प्रकरणांमध्ये मला जामीन मिळाला असूनही, पीडीएम सरकार मला अटक करण्याचा विचार करत आहे. त्यांचे चुकीचे हेतू माहित असूनही, मी इस्लामाबाद आणि न्यायालयाकडे जात आहे कारण माझा कायद्याच्या राज्यावर विश्वास आहे," असे ट्वीट पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केले आहे.
तसेच पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी (Imran Khan) म्हटले आहे, आता हे देखील उघड आहे की लाहोरचा संपूर्ण वेढा हा एखाद्या खटल्यात मी न्यायालयात हजर राहण्याची खात्री करण्यासाठी नव्हता तर मला तुरुंगात नेण्याचा हेतू होता. जेणेकरून मला आमच्या निवडणूक प्रचाराचे नेतृत्व करता येऊ नये.
हे ही वाचा :