आर्यन खानला कोर्टाचा दणका; कोठडीत वाढ | पुढारी

आर्यन खानला कोर्टाचा दणका; कोठडीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : शनिवारी ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीने अटक केली आहे. आज आर्यन खान याला कोर्टाने ७ ऑक्टोबरपर्यंत कोठडीत वाढ केली आहे.

शाहरुख खानच्या मुलाला मोठा दणका कोर्टाने दिला. आर्यन खानने कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली होती. आता मात्र त्याला तीन रात्री कोठडीत काढाव्या लागणार आहेत. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या तीन रात्री एनसीबी कोठडीत असणार आहेत.

आर्यन खानकडे ड्रग्ज सापडले नाही. त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होते, वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टात दावा केला. तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडले असा एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला. आर्यनच्या चॅटमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याचा एनसीबीने दावा केला आहे. क्रूझ ड्रग्ज पार्टीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा एनसीबीकडून दावा करण्यात आला आहे. याबाबतच्या तपासासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळावी अशी मागणी एनसीबीने केली होती.

आर्यन खानसह तिघांना अटक

मुंबईजवळ शनिवारी रात्री भरसमुद्रात ‘कॉर्डेलिया द एम्प्रेस’ या आलिशान क्रूझवर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने छापा टाकून रेव्ह पार्टी उधळली आणि 8 जणांची धरपकड केली. या प्रकरणात बॉलीवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्यासह तिघांना अटक करण्यात आली.

या तिघांकडून 13 ग्रॅम कोकेन, 5 ग्रॅम एमडी, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे समजते.

अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) या कारवाईत मुनमुन धमीचा, नूपुर सारिका, इस्मित सिंग, मोहक जस्वाल, विक्रांत छोकर, गोमित चोप्रा, अरबाज मर्चंट आणि शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान यांना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली.

हेही वाचलत का?

Back to top button