मुंबई; पुढारी ऑनलाईन : मुंबईची रेव्ह पार्टी आणि शाहरुख खानच्या मुलाची म्हणजे आर्यन खानची अटक ही मनोरंजन विश्वातील आणि गुन्हे विश्वातील मोठी बातमी ठरली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार एनसीबीचे अधिकारी कालपासून आर्यनसह इतर ८ जणांची कसून चौकशी करत आहे. त्यात मागील ४ वर्षांपासून आर्यन खान हा अंमली पदार्थांचं सेवन करत असल्याची माहिती समोर आली आहे.
सविस्तर माहिती अशी की, "या चौकशीत आर्यनवर अनेक प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. यावेळी आर्यन हा गेल्या ४ वर्षांपासून ड्रग्जचे सेवन करत होता. आर्यनने फक्त भारतातच नाही तर यूके आणि दुबईसह इतर देशात ड्रग्जचे सेवन केले होते", अशी माहिती समोर आली आहे.
रेव्ह पार्टीमागे बटाटा गॅंगचा हात ?
एनसीबीच्या प्राथमिक तपासात क्रूझवरील रेव्ह पार्टी आयोजनामागे बटाटा गॅंगचा मोठा हात असण्याची शक्यता आहे, अशी माहिती समोर आली आहे. इतकंच नाही तर, गुरूग्राम आणि दिल्लीपर्यंत तपासात संशय आढळून आलेला आहे.
सूत्रांकडून असं सांगितलं जातं आहे की, मुंबईमध्ये अंमली पदार्थ पोहोचण्याचं काम बटाटा गॅंग करते. मागील काही दिवसांमध्ये त्यांची सक्रियता खूप वाढलेली आहे. अंमली पदार्थ तरुणांपर्यंत पोहोचावेत यासाठी बटाटा गॅंग अशा रेव्ह पार्ट्यांचे आयोजन करते.
क्रूझवरील रेव्ह पार्टीतदेखील बटाटा गॅंगनेच ड्रग्ज पुरवली होती. कारण, मुंबईत सर्वात मोठा ड्रग्ज सप्लायर फारुख बटाटा आणि त्याचा मुलगा शादाब बटाटा हे काही लोकांना हाताशी घेऊन संपूर्ण मुंबईत ड्रग सप्लाय करत असतात, अशीही माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
पहा व्हिडीओ : अभिनेना चेतनने बनवली ज्ञानदासाठी स्पेशल काॅफी
हे वाचलंत का ?