Arshad Warsi : अरशद वारसीने स्टॉक मार्केटमध्ये असं काय केलं की SEBI ने केलं बॅन | पुढारी

Arshad Warsi : अरशद वारसीने स्टॉक मार्केटमध्ये असं काय केलं की SEBI ने केलं बॅन

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेता अरशद वारसी आणि त्याच्या पत्नीवर सेबीने कारवाई केली आहे. त्याच्यावर असा आरोप आहे की, अरशद वारसीने यूट्यूबवर छोट्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केली आहे. प्रमोशनल व्हिडिओ बनवून छोट्या गुंतवणूकदारांमध्ये गोंधळ निर्मीण केला आहे. गुंतवणूकदांराना कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. तक्रार मिळाल्यानंतर सेबी या प्रकरमाचा तपास करत आहे.

SEBI ने शेअर्सची हेराफेरी केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेते अरशद वारसी (Arshad Warsi) वर कारवाई करण्यात आलीय. मार्केट रेगुलेटर (The Securities and Exchange Board of India) ने वारसी आणि त्याची पत्नी मारिया गोरेटी (Maria Goretti) वर मार्केटमध्ये व्यवहार करण्यावर बॅन केलं आहे. हे पाऊल सोशल मीडियाच्या माध्यमातून कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासंदर्भातील सूचना देणारे दिशाऊल करणारे व्हिडिओ अपलोट केल्यानंतर उचलण्यात आले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांची ५० कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक झाली आहे.

SEBI ला या प्रकारची तक्रार मिळाली की, साधना ब्रॉडकास्ट स्टॉक्सच्या किंमतीत हेराफेरी केली जात आहे. जे युनिट्स हे काम करत आहेत, ते शेअर्सदेखील काढत आहेत. या प्रकरमाचा तपास करताना सेबीने गुरुवारी अभिनेता (Arshad Warsi), त्याची पत्नी साधना ब्रॉडकास्टच्या प्रमोटर्ससह ४४ युनिट्सना सिक्युरिटी मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सेबीला तक्रार मिळाली होती की, दिशाभूल करमारे यूट्यूब व्हिडिओ (You Tube Video) च्या माध्यमातून गुंतवणूकदारांना आमिषे दाखवण्यात येत होती.

रेग्युलेटर (SEBI) ने मागील वर्षी एप्रिल-सप्टेंबर दरम्यान त्या प्रकरणाचा तपास केला होता, ज्यामध्ये ही माहिती समोर आली होती की, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर साधना ब्रॉडकास्टच्या शेअरर्समध्ये तेजी आली आणि प्रमोटर्सने खूप पैसा कमावला.

Back to top button