

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायक राहुल सिप्लिगुंज आणि काल भैरव ऑस्कर २०२३ मध्ये 'नाटू नाटू' वर लाईव्ह परफॉर्म करतील. तर दीपिका पादुकोण प्रेजेंटर म्हणून सहभागी होईल. भारताचा 'छेल्लो शो', 'नाटू नाटू' गाण्यासह दोन डॉक्युमेंट्री ऑस्करच्या रेसमध्ये आहेत.
हे वर्ष ऑस्कर २०२३ मध्ये भारतासाठी अभिमानाचे क्षण घेऊन आला आहे. एकीकडे 'छेल्लो शो' आणि दुसरीकडे 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' सॉन्ग ऑस्करसाठी नॉमिनेट झालं आहे. दुसरीकडे दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) ऑस्कर ॲवॉर्डमध्ये सहभागी होईल. दीपिका पादुकोण १३ मार्च रोजी होणाऱ्या ऑस्कर सोहळ्यात प्रेजेंटर बनेल. ही माहिती स्वत: दीपिका पादुकोणने फॅन्सना दिलीय. (Deepika Padukone)
दीपिकाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर माहिती दिलीय. त्यानंतर फॅन्स तिचे अभिनंदन करत आहेत. नेहा धूपिया ते दीपिकाचा पती अभिनेता रणवीर सिंहने तिच्याबद्दल खूप प्रेम व्यक्त केलंय आणि शुभेच्छा दिल्या आहेत.
दीपिकाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, तिच्याशिवाय, ऑस्कर २०२३ मध्ये यंदा कोण सेलेब्स प्रेजेंटर असतील. दीपिकाने सांगितलं की, यावेळी ड्वेन जॉनसन, मायकल बी जॉर्डन, जेनिफर कोनली, सॅम्युल एल जॅक्सन, मेलिसा मेक्कार्थी, जो सलदाना, जोनाथन मेजर्स, क्वेस्टलव आणि डोनी येन ऑस्करमध्ये प्रेजेंटर आहे. यांच्याशिवाय, रिज अहमद, एमिली ब्लंट, ग्लेन क्लोज, एरियाना डीबोस, जेनेल मोनाए आणि सॅम्युल एल जॅक्सनदेखील ऑस्कर प्रेजेंटर असतील.
ऑस्करमध्ये 'छेल्लो शो' शिवाय भारतातील दोन डॉक्युमेंट्री – All That Breathes और The Elephant Whisperers नॉमिनेटेड आहेत.