Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर! | पुढारी

Discover Konkan : कोणार्कचं नव्हे तर कोकणातही आहे अप्रतिम सूर्यमंदिर!

स्वालिया शिकलगार – पुढारी ऑनलाईन डेस्क : तुम्हाला माहितीये का, भारतात असंख्य सूर्यमंदिरे आहेत. त्यापैकी प्रसिद्ध आहे ते ओडिशा राज्यातील कोणार्क आणि गुजरातमधील मोढेरा. (Discover Konkan) त्याचबरोबर सौराष्ट्रात (गुजरात) वेरावळ बंदराजवळ प्रभासपट्टण येथे फार प्राचीन सूर्यमंदिर आहे. पण आपल्या महाराष्ट्रातदेखील सूर्यमंदिर आहे, हे फार कमी लोकांना कदाचित माहिती असावी. तेही अतिशय रेखीव, सुबक, अप्रतिम कोरीव काम केलेलं कोंकणी पद्धतीचं मंदिर! ‘खय हा म्हणून काय इचारतास? अहो आपल्या कोकणातचं असा’. (Discover Konkan)

कनिकादित्य मंदिर असे त्या सूर्यमंदिराचे नाव आहे. आज आम्ही कशेळीतील हे कनिकादित्य सूर्य मंदिर, पावस, पूर्णगड, देवघळी बीच आणि जयगडविषयी माहिती सांगणार आहोत. या ठिकाणांना भेट का द्यावी, तिथे कसं जावं, कुठं राहावं, काय खावं, काय काय पाहावं, याविषयी सविस्तर माहिती देणार आहोत. नेहमीच्या टूरपेक्षा ही कोकण किनाऱ्याची ट्रीप तुमच्यासाठी नक्कीच स्मरणीय ठरेल. मग विकेंडला नक्की प्लॅन करा.

पावस - स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर
पावस – स्वामी स्वरुपानंद समाधी मंदिर

पावस –

पावस गाव गौतमी नदीच्या काठावर वसले आहे. हे गाव रत्‍नागिरी शहरापासून १५-२० किमी. अंतरावर आहे. पावस हे प्रसिद्ध धामिर्क पयर्टनस्थळ आहे. येथे रोज हजारे भाविक भेट देत असतात. येथे स्वामी स्वरुपानंद यांचे समाधी मंदिर असून येथे निवासाची सोय आहे. स्वामी स्वरुपानंद यांचे विलोभनीय मंदिर पाहण्यासारखे आहे. मंदिरात खिचडी-लोणचे प्रसाद तुम्हाला मिळतो. पावसमध्ये तुम्ही २०० वषार्ंपूवीर्चे स्वामींचे जन्मघर, नवलाई मंदिर, श्री विश्वेश्वर मंदिर, गौतमा नदी पाहू शकता.

सोलकढी

मंदिराबाहेर फणसपोळी, कैरी पन्हे, सोलकढी, आंबापोळी, मॅंगो पल्प, लिंबू सरबत, जांभूळ सरबत, आवळा सरबत, फणस, वेफसर्, वेगवेगळे पापड, गोड पदाथर्, चकली, लाडू आदी वस्तूंची इथे दुकाने आहेत. तुम्ही या वस्तू खरेदी करू शकता.

स्वामी स्वरुपानंद मठ जन्मघर

कसे जाल? – १) आंबा घाट-साखरपा मागेर् पावस. २)गणपतीपुळेत दशर्न घेऊन पावसला जाऊ शकता.

गणेशगुळे मंदिर

गणेशगुळे –

गणेशगुळेमध्ये स्वयंभू गणपती मंदिर आहे. तुम्हाल इथे एक आत्मिक समाधान मिळेल, असा मंदिराचा परिसर आहे. हिरव्यागार परिसरात नीरव शांतता अनुभवायला मिळते. पुढे खूप शांतता असणारा गणेशगुळेचा बीच आहे. बीचवर एक पीरदगार्देखील तुम्हाला पाहता येईल.

गणेशगुळे मंदिर

कसे जाल? – पावसहून गणेशगुळेला जाता येते. हे अंतर खूप कमी आहे.

गणेशगुळे बीच

कुठे राहाल? – गणेशगुळे येथे राहण्यासाठी रुम्स उपलब्ध आहेत.

काय खाल? – येथे घरगुती पद्धतीचे जेवण मिळते. हे ठिकाण शहरापासून आत आहे. त्यामुळे राहत्या ठिकाणी तुम्हाला मासे मिळतीलचं असे नाही. त्यामुळे एक तर तुम्हाला रत्नागिरीतून मासे घेऊन यावे लागेल. याला दुसरा पयार्य म्हणजे गणेशगुळेच्या बीचपासून १ किमी. अंतरावर रस्त्यालगत मांसाहारी हाॅटेल्स आहेत. येथे अतिशय चविष्ट मच्छी, गोलमा, कोळंबी, बांगडा, सुरमई, तांदळाची भाकरी, चपाती, भात, घावणे, फणसाची भाजी, सोलकढीवर तुम्ही ताव मारू शकता. (Discover Konkan)

पूणर्गड किल्ला

पूर्णगड –

शेर शिवराज चित्रपटाचा क्लायमॅक्स रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्यावर शूट करण्यात आला आहे. त्याच पूर्णगड किल्ल्याबद्दल आम्ही सांगणार आहोत. मुसळधार पाऊस सुरु असताना या किल्ल्यावर शेर शिवराजचे शूट झाले आहे. शेर शिवराज चित्रपटाचा क्लायमॅक्स रत्नागिरीतील पूर्णगड किल्ल्यावर शूट करण्यात आला आहे. त्याचं पूर्णगड किल्ल्याबद्दल आम्ही सांगणार आहोत.

पूणर्गड किल्लाकडे जाणारी वाट

पूर्णगड सहसा नजरेला दिसत नाही. थोडे अंतर चालल्यानंतर जुन्या जांभा दगडी पायऱ्या दिसतात. या पायऱ्यांवरून चढून वर जावे लागते.

पूणर्गड किल्ला परिसरातील मंदिर

गणेशगुळेतून पूणर्गड जवळ अंतर आहे. सुरुवातीला तुम्हाला एका बाजूला समुद्र आणि दुसऱ्या बाजूला खडक, माती, झाडे दिसतील. पण, आत आत मध्ये जाल तसे वर चढण्यास दगडी पायऱ्या दिसतील. या पायऱ्यांवरून चढून गेल्यानंतर एक चौकोना बाव दिसते. त्यापुढे किल्ल्यांचे भव्य बुरूज आणि लांबलचक तटबंदी दिसते. पुढे गेल्यानंतर मारुतीचे मंदिर दिसते. मारुतीच्या हे मंदिर त्याकाळातील असून त्याची डागडुजी करून पुन्हा उभारण्यात आले आहे. यापुढे जरा पुढे गेल्यास किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार नजरेस पडते. कमानीवर कोरलेले चंद्र-सूयर् काळाच्या ओघात अस्पष्ट झालेले दिसतात.

पूणर्गड किल्ला परिसरातील मारुती मंदिर

किल्ल्याचे प्रवेशद्वार पाहण्यासारखे आहे. येथून पुढे गेल्यानंतर किल्ल्याच्या आतील दृश्य नजरेस भरते. मोठी तुळस, पहाऱ्यासाठी असलेल्या भिंती, दिव्यासाठी देवळ्या दिसतात. याच किल्ल्याच्या बुरूजांवरून आणि खिडक्यांमधून लांब पसरलेल्या समुद्राचे विहंगम दृश्य दिसते. शांततेत खळखणाऱ्या लाटांचा आवाज कानी पडतो. या किल्ल्याला प्रदक्षिणा घालण्याचा मागर् खुला ठेवण्यात आला आहे. त्यामुळे हा किल्ला तुम्ही फिरून पाहू शकता. किल्ल्याबाहेर अनेक छोटी-मोठी मंदिरे आहेत. तसेच किल्ल्याबाहेर वास्तव्यास असणारी काहींची घरे आहेत. खूप सारी झुडूपे, झाडी किल्ला परिसरात दिसते.

पूणर्गड किल्ला

कसे जाल? – पावस-गणेशगुळे-पूर्णगड. गणपतीपुळेपासूनही तुम्ही तुमचा पूर्णगडाकडे जाणारा मार्ग निवडू शकता.

कनकादित्य मंदिर, कशेळी

कशेळी

कनकादित्य मंदिर – रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावातील हे सुंदर मंदिर आहे. मंदिर साधारण ९०० वर्षे प्राचीन आहे. या मंदिरात गेल्यानंतरची अनुभूती विलक्षण आहे. अख्य्ख्या महाराष्ट्रात असे मंदिर नसेल, असे वाटते. कोकणी पद्धतीचे कौलारू मंदिर बाहेरून दिसताना अगदी साधे दिसते. पण, आत प्रवेश केल्यानंतर त्याचे फिनिशिंग पाहून तुम्ही अवाक्‌ राहाल. मूर्तीवरील मुकूट हे दाक्षिणात्य पद्धतीचे असून ती अत्यंत जुनी आहे.

कनकादित्य मंदिर कशेळी

ही मूर्ती देवघळी समुद्रकिनारी असलेल्या गुहेत सापडली, असे सांगितले जाते. किनाऱ्यावर ज्या गुहेत कनकादित्याची मूर्ती सापडली त्यास ‘देवाची खोली’ किंवा ‘देवघळी’ असं म्हटलं जातं. देवघळीच्या समुद्रकिनारी काळ्या पाषाणात ही नैसर्गिक गुहा आहे.
कनकादित्य मंदिरात सुमारे ८५० वर्षापूर्वीचा ताम्रपट आहे. या ताम्रपटात शिलाहार वंशीय द्वितीय भोजराजाने अट्टविर (आत्ताचे आडिवरे) भागातील कशेळी गाव बारा ब्राम्हणांच्या प्रतिदिन भोजनासाठी दान दिले असा उल्लेख आढळतो.

कसे जाल? – गणपतीपुळे- गणेशगुळे-कशेळी गाव-कनकादित्य मंदिर

कुठे राहाल? – येथे राहण्यासाठी भक्त निवास आहे. किफायतशीर दरात येथे राहणे-खाण्याची सोय आहे.

घावणे

काय पहाल? –

सनसेट पॉईंट – या किनाऱ्यावर महाराष्ट्र सरकारने सनसेट पॉईंट उभारला आहे, त्यास टेबल पॉईंट असेही म्हटले जाते. या टेबल पॉईंटवर उभारून तुम्ही निळाशार समुद्रासमोर, भिरभिरणाऱ्या वाऱ्यात सूर्यास्त पाहू शकता.

देवघळी

देवघळी बीच – देवघळी बीचला तुम्ही एकदा तरी भेट द्यायला हवी. येथे गेल्यानंतर समुद्राच अगदी जवळच तुम्हाला कोकम, लिंबू सरबत आणि कोल्ड्रींक्सदेखील मिळू शकतात. रत्नागिरी जिल्ह्याचं एक टोक देवघळीच्या बीचवर संपतं. नितळ पाणी आणि खडकांवर धडकणाऱ्या लाटांमुळे पाण्यातून वाहून आलेल्या शंख-शिंपल्यांनी खडकांवर नक्षी तयार केलीय. छोटा बीच असून इथे जाणं, अद्भूतचं आहे.

कुठे राहाल? – देवघळी बीच किनारी राहण्याची सोय नाही. पण, तुम्ही येथे टेंट विक्री करणाऱ्यांकडून टेंट विकत घेऊन या बीचवर एक रात्र घालवू शकता. सोबत टेंटवाल्यांकडून तुमच्या जेवणाची सोय होऊ शकते. पण, एक मात्र लक्षात ठेवा, तुम्हाला मासे हेव असतील तर राजापुरातून येतानाचा तुम्हाला स्वत:ला मासे आणावे लागतात. त्यानंतर तुम्हाला ते जेवण बनवून देऊ शकतात. येथील ग्रामपंचायतीचे स्वच्छतागृह वापरण्यासाठी दिले जाते.

रत्नागिरीमध्ये आणखी काय पाहाल – जाकादेवी मंदिर, जयगड, आडिवरे, आंबोळगड, आंबोळगडातील गगनगिरी महाराजांचे आश्रम, मुसाकाजी बंदर इत्यादी.

 

Back to top button