Sona Mohapatra : 'शॉर्टकटने पैसे मिळवणाऱ्यांना मी चांगलीच ओळखते' | पुढारी

Sona Mohapatra : 'शॉर्टकटने पैसे मिळवणाऱ्यांना मी चांगलीच ओळखते'

पुढारी ऑनलाईन डेस्क : गायिका सोना मोहपात्रा नेहमीच स्पष्ट आणि बेधडक स्टेटमेंटसाठी ओळखली जाते. ट्विटरवर ती खूप ॲक्टिव्ह राहते. मी टू मोहिमेंतर्गत तिने उघडपणे कैलाश खेर ते साजिद खानपर्यंत निशाणा साधला आहे. आता तिने पंजाबी अभिनेत्री शहनाज गिलवर निशाणा साधलाय. (Sona Mohapatra) शहनाजच्या एका कमेंटमुळे सोना नाराज आहे, सोनाने शहनाज गिलच्या टॅलेंटवर प्रश्न उपस्थित केले आहेत. सोना म्हणाली, शहनाजला त्या तरुणींसाठीही सन्मान दाखवायला हवं होतं, ज्याांनी साजिद खानवर आरोप केले होते. (Sona Mohapatra)

शहनाजला खरं-खोटं ऐकवलं

सोनाने लैंगिक शोषणाचा आरोप असलेल्या साजिद खानला नॅशनल टिव्हीवर कशा प्रकारे तिने समर्थन दिले होते, हे देखील सोनाने सांगितलं. त्यावेळी शहनाजने त्या तरुणींना समर्थन द्यायला हवे होते, अशी अपेक्षा होती, असेही सोनाने नमूद केले. जेव्हा सोनाला विचारण्यात आले की, साजिद खानला समर्थन करण्यासाठी सोना केवळ शहनाजलाच का समर्थन देत आहे? त्यावर ती म्हणाली- प्रिय जॅकलीन फर्नंडिससारखी अभिनेत्री स्वत: उभारण्याचा प्रयत्न करत आहे. माहिती नाही शहनाजमध्ये काय टॅलेंट आहे. फक्त तिला रिॲलिटी शोमधून लोकप्रियता मिळाली इतकंचं. पण, मी त्या महिलांबद्दल जाणते, ज्या शॉर्टसर्किटने पैसे आणि रोल मिळवतात.

सोनाच्या ट्विटने ट्रोल

ट्विट केल्याने सोना ट्रोल होत आहे. एका युजरने म्हटले आहे-केवळ यासाठी की सोना सॉफ्ट टार्गेट आहे, म्हणून तुम्ही काहीही बोलू शकता. रिपोर्टनुसार, सोनाला बिग बॉस १६ साठी आमंत्रित केलं होतं. आणखी एका युजरने म्हटलं-आपण कलर्स, एंडेमोल खान आणि इतर स्पर्धकांना आवाहन का करत नाही. तुमच्यात एवढी हिंमत आहे?

Back to top button