संगमनेर : पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; पिस्तूलाच धाक दाखवून कर्मचाऱ्यास लुटले | पुढारी

संगमनेर : पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा; पिस्तूलाच धाक दाखवून कर्मचाऱ्यास लुटले

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील साकुर येथील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या आज्ञात तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवुन दिवसभरातील पेट्रोल डिझेल व ऑइलचे जमा झालेले २ लाख ५० हजार ७४७ रोख रक्कम चोरून नेल्याचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

अधिक माहिती अशी की, भगवान पेट्रोल पंपावर रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास तोंडाला रुमाल बांधलेले ३ अज्ञात दरोडेखोर मोटर सायकल मध्ये पेट्रोल भरण्याच्या बहाण्यावरून पंपावर आले. त्यावेळी पंपावरील कर्मचारी विलास भाऊसाहेब कातोरे हा पेट्रोल भरण्यासाठी पंपाकडे जात असताना ते तिघे अज्ञात दरोडेखोर केबिनमध्ये घुसले आणि केबिनमध्ये पैसे मोजत असणारा कर्मचारी सुनील गीरे यास एकाने पिस्तुलाचा धाक दाखवत तुझ्याकडे असणारे सर्व पैसे आम्हाला दे नाही, तर गोळी घालून मारून टाकण्याची धमकी दिली.

तर दुसऱ्याने त्याच्या हातातील पैसे हिसकावून घेतले, तर तिसऱ्याने ड्राव्हरमध्ये असलेली काळ्या रंगाची बॅग काढून त्यातील पैसे काढून घेतले आणि मांडवे गावच्या दिशेने पळून गेले. पंपावरील कर्मचारी चोर चोर असे मोठ्याने ओरडल्यामुळे आसपासचे नागरिक पंपाकडे धावले, तर गिरे यांनी या घटनेची माहिती पंपाचे मालक आदिक खेमनर आणि मॅनेजर दत्ता शेंडगे यांना दिली. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पेट्रोल पंपावरील कर्मचारी सुनील गीरे यांनी घारगाव पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील घारगाव बस स्थानकाजवळ असणाऱ्या अनुदेव अनंत ओटी शेरी या परप्रांतीय टायर दुकानमालकावरती चाकूने हल्ला करून त्यास गंभीरित्या जखमी केले त्यानंतर त्याच दरोडेखोरांनी साकुर जवळील पंपावरील कर्मचाऱ्यास लुटले असल्याचा प्रकार घडला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

Back to top button