bigg boss marathi-3 : चावडीवर गायत्री दातारने सोनालीला सुनावले खडेबोल

गायत्री दातारने सोनाली पाटीलला सुनावले खडेबोल
गायत्री दातारने सोनाली पाटीलला सुनावले खडेबोल

पुढारी ऑनलाईन :

मराठी 'बिग बॉस ३'च्या (bigg boss marathi-3) घरातील खेळाची रंगत आता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. 'बिग बॉस' (bigg boss marathi-3) कडूनही आता वेगवेगळे टास्क दिले जात आहेत. ते पूर्ण करण्यासाठी प्रत्येक स्पर्धकाची चढाओढ सुरु आहे. या दरम्यान अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. अशीच टीका सोनाली पाटीलने गायत्री दातारच्या हसण्यावर केली आहे; मग काय चावडीवर गायत्री दातारने सोनालीला  खडेबोल सुनावले आहेत.

मुळात गायत्री दतार शांत आणि विनम्र स्वभावाची आहे. परंतु 'बिग बॉस'च्या चावडीवर कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनी विचारलेल्या प्रश्नावर गायत्रीने ठामपणे मत मांडले आहे.

सोनाली पाटीलच्या या नकारात्मक टीकेवर गायत्रीने तिला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

गायत्री दातारच्या हसण्यावर आणि तिच्या गालावर पडणाऱ्या खळीचे असंख्य चाहते आहेत. असे असताना सकारात्मक बाबीवर टीका करणे कितपत योग्य आहे. असा थेट प्रश्न गायत्रीने सोनालीला विचारला.

एखाद्याच्या दिसण्यावर, रंगरूपावर, अथवा अवयवावर वक्तव्य करणेच मुळात चुकीचे आहे.

हाच मुद्दा धरून गायत्रीने सोनालीची चांगलीच शाळा घेतली. तीही 'बिग बॉस'समोर.

एरव्ही शांत स्वभावाची गायत्री प्रसंगी ठामपणे उभी राहू शकते, हे तिच्या या कृतीतून स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे आता बिग बॅास'च्या घरात टक्कर द्यायला गायत्री सज्ज झाली आहे.

कॅप्टन्सीसाठी गायत्री दातार पात्र ठरेल का?

दरम्यान, कॅप्टन्सी कार्यासाठी दोन उमेदवार निवडण्याचा आदेश बिग बॉस यांनी विजेत्या टीमला दिलाय.

विचारविनिमयानंतर जय आणि गायत्री दातार ही दोन नावे पुढे आली आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरात कधी कोणत्या सदस्याला कोणाची गरज कधी लागेल सांगता येत नाही.

त्यामुळे प्रत्येक वेळेला खूप विचार करून बोलणं, वागणं अतिशय महत्वाचे असते.

या घरात सगळंच अनिश्चित आहे, असं म्हणायला हरकत नाही. त्याचचं उदाहरण म्हणजे आज विकाससोबत गायत्री चर्चा करताना दिसणार आहेत.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news