

पुढारी ऑनलाईन :
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (tujhya majhya sansarala aani kay hava) ही मालिका झी मराठीवर भेटीस आलीय. सध्या एकत्र कुटुंब पद्धती लोप पावत आहे. विभक्त कुटुंब पद्धती फोफावतीय. असे असताना पुन्हा एकत्र कुटुंब पद्धतीला नवसंजीवनी देणारी ही मालिका आहे. या मालिकेतील बयो आजी ही सगळ्यांना आपल्या घरातीलचं एक सदस्य आहे असे वाटते. अशी बयो आजी आपल्याला देखील असावी, असं सगळ्यांना वाटतं. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (tujhya majhya sansarala aani kay hava) मालिकेमध्ये या आजीची भूमिका अभिनेत्री सुरेखा लहामगे – शर्मा यांनी साकारलीये. त्यांच्यासोबत साधलेला हा खास संवाद.
– आजकाल कोणी मला फोन केला किंवा मला भेटलं तर ते मला बयो आजी म्हणूनच बोलावतात. माझं नाव सुरेखा आहे हे सगळे विसरून गेले आहेत. आता माझी बयो आजी हीच ओळख बनली आहे. मी या व्यक्तिरेखेच्या प्रेमात आहे आणि ती साकारायला मला खूप मजा येतेय.
– प्रेक्षकांना मालिका खूपच आवडतेय. मला बऱ्याच लोकांनी सांगितलं की, रात्री ९ वाजले कि आम्ही आधी टीव्हीसमोर जाऊन बसतो. संपूर्ण कुटुंबासोबत ही मालिका बघतो. विशेष म्हणजे या मालिकेत एकत्र कुटुंब पद्धती दाखवण्यात आली आहे. ही गोष्ट प्रेक्षकांना सगळ्यात जास्त भावली आहे.
– सध्या स्पर्धेच्या युगात विभक्त कुटुंबात रमणाऱ्या आणि एकत्र कुटुंबापासून लांब राहणाऱ्या अनेकांना कोरोना सारख्या महामारीनं हानी पोहोचवली. पण, जाता जाता सगळ्यांची माणुसकीने वागणे किती गरजेचे आहे. हे पटवून दिले.आपण लॉकडाऊनमधून अनलॉक झालो. कुटुंब पद्धती, आपली नाती कशी जपावी, प्राणिमात्रांवर प्रेम करा असे अनेक संदेश देणारी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस आलीये. ती प्रेक्षकांना आवडतेय याचा आनंद आहे. याचं सगळं श्रेय जातं ते म्हणजे या मालिकेच्या संपूर्ण टीमला.
– शूटिंग सुरु होऊन काहीच दिवस झाले आहेत. पण, अगदी थोड्याच दिवसात आम्हा सगळ्यांची गट्टी जमली आहे. त्यामुळे आता कुठे धमाल मस्तीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे इथून पुढे किस्से हळूहळू रंगतील.