पुढारी ऑनलाईन डेस्क : हॉलीवूड निर्माता हार्वे विंस्टीनला (Harvey Weinstein) आणखी एका बलात्काराच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. हार्वे आधीपासूनच बलात्कार आणि लौंगिक शोषणाच्या आरोपाखाली २३ वर्षांची शिक्षा भोगत आहे. डिसेंबरमध्ये त्याला आणखी दोन लैंगिक शोषणप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. (Harvey Weinstein)
हार्वे विंस्टीन कोर्टात जजकडे दयेची भिक मागू लागला. तो म्हणाला, 'कृपया मला आजीवन कारावासाची शिक्षा देऊ नका. मी लायक नाही. याप्रकरणातील खूप गोष्टी चुकीच्या आहेत.' पण, जजने हार्वे विंस्टीनचे म्हणणे ऐकून घेतले नाही.
ऑस्कर विनर हॉलीवूड प्रोड्यूसर हार्वे विंस्टीनचे संपूर्ण आयुष्य आता तुरुंगात जाईल. हार्वे विंस्टीनला इटलीच्या एका अभिनेत्रीवर बलात्काराच्या आरोपाखाली १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. हार्वे विंस्टीन आधीपासूनच लैंगिक शोषण आणि बलात्कार प्रकरणी तुरुंगात आहे. आता त्याला ज्यादा १६ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. हार्वे विंस्टीनला गुरुवारी २३ फेब्रुवारीला शिक्षा सुनावण्यात आलीय.
हार्वेला लॉस एंजेलिसच्या कोर्टाने २०१३ मध्ये इटलीच्या एका अभिनेत्रीसोबत लैंगिक शोषण आणि बलात्काराच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली. हार्वे विंस्टीनवर मीटू अंतर्गत जवळपास ८० महिलांनी बलात्कार आणि शोषणाचे आरोप केले होते. काही प्रकरणात त्याला दिलासा आणि निर्दोष ठरवण्यात आले होते. पण, डिसेंबर २०२२ मध्ये त्याला लैंगिक शोषणाच्या प्रकरणात दोषी ठरवण्यात आलं होतं.
ज्या अभिनेत्रीने हार्वे विंस्टीनवर आरोप केले आहेत, तिने रडत जजकडे मागणी केली की हार्वेला अधिकाधिक शिक्षा देण्यात यावी. ती म्हणाली, 'हार्वे विंस्टीनच्या स्वार्थी आणि घृणास्पद गोष्टींनी माझं आयुष्य खराब केलं. त्याने माझे जे नुकसान केलं आहे, त्याची भरपाई केवळ तुरुंगाच्या शिक्षेने होऊ शकत नाही.'