‘कोण होणार करोडपती’चा नवा सीझन लवकरच | पुढारी

'कोण होणार करोडपती'चा नवा सीझन लवकरच

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्ञान आणि बुद्धी यांच्या जोरावर करोडपती होण्याची अनोखी संधी देणार्‍या ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचा नवीन सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाच्या सीझनचं वैशिष्ट्य म्हणजे विजेत्याला २ करोड रुपये जिंकण्याची संधी मिळणार आहे.

यंदाही ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर करणार आहेत. ‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल. यंदाच्या सिझनमध्ये काय वेगळेपण असेल, स्पर्धक कसे असतील, २ करोड रुपये कोणी जिंकू शकेल का; हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.

Back to top button