Solutions on Bad Mood : मूड चांगला ठेवण्यासाठी ‘हे’ करुन पाहा | पुढारी

Solutions on Bad Mood : मूड चांगला ठेवण्यासाठी 'हे' करुन पाहा

पुढारी ऑनलाईन डेस्क : जर तुमचा मूड छोट्या-छोट्या गोष्टींवरून खूप लवकर खराब होत असेल तर तुमचं मनदेखील शांत राहणार नाही. (Solutions on Bad Mood ) तुम्हाला कोणत्याच कामात लक्ष लागणार नाही. यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. यापद्धतीने टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा मूड ठिक करू शकता. (Solutions on Bad Mood )

मनात सुरु असलेले विचार जाणून घ्या

सर्वात आधी तुमच्या मनात असलेले विचार जाणून घ्या. आपण का आणि कशासाठी विचार करत आहोत, हा प्रश्न स्वत: ला विचारा. जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मिळाले तर विचार करणे थांबवा. जर तुम्ही विचार करणे नाही थांबवले तर तुमचा मूड अचानक बदलेल. कोणत्याही कारणाशिवाय या गोष्टींचा अधिक विचार करू नये. त्याऐवजी तुम्हा ज्या कामात रस आहे, त्याकडे लक्ष द्यावे.

तुमच्या भावना लिहून काढा

जर तुम्ही तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू इच्छिता तर तुमच्या भावना एका कागदावर किंवा डायरीमध्ये लिहून काढा. लेखन केल्याने मनातील विचार स्थिर होतात. याशिवाय मोटिवेशनसाठी चांगले भाषण ऐका अथवा तुमचं आवडतं पुस्तक देखील वाचू शकता. तुम्हाला भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि मूड चांगला राहण्यासाठी तुमची आवडती गाणीदेखील ऐकू शकता.

आवडत्या गोष्टी करा

मूड खराब असेल तेव्हा तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात, त्या गोष्टी करा. उदाहरमार्थ, सायकल चालवणे, पोहणे, गाणे म्हणणे, गिटार वाजवणे, सवयंपाक करणे, पुस्तके वाचण, फिरायला जाणे वगैरे.

व्यायाम करा –

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्तम उपाय म्हणजे व्यायाम करणे.

मसाज घ्या-

मसाज घेतल्याने तुम्हाला फ्रेश तर वाटेलचं मूड देखील चांगला होईल.

हेल्दी फूड खा –

ज्याला आपण हेल्दी फूड म्हणू असे पदार्थ खा. उदाहरणार्थ, चेरी, सुका मेवा, फळे खा.

शांत झोप घ्या –

अपुरी झोप कधीच घेऊ नका. नाही तर तुम्हा दिवसभर आळस आल्यासारखे वाटेल. शिवाय मूडदेखील खराब होऊन वारंवार झोप येईल. यासाठी शांत आणि पुरेशी झोप घ्या.

women's sleep
women’s sleep

जर तुम्हाला आपले मित्र किंवा घरच्या मंडळींसोबत बोलायला आवडत असेल तर तुमच्या भावना त्यांच्यासमोर व्यक्त करा. स्वत:साठी वेळ काढा. एखाद्या ट्रीपचा प्लॅनदेखील करू शकता.

Back to top button