चंद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी | पुढारी

चंद्रपूर : अज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक जखमी

चंद्रपूर : पुढारी वृत्तसेवा – नागभिड ब्रम्हपूरी मार्गाने जात असलेल्या दुचाकीस्वारांना अज्ञात वाहनाने जबर धडक दिल्याने एका जणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात आज मंगळवारी अकरा वाडण्याच्या सुमारास घडला. मृतक अक्षय दहिवले हा ब्रम्हपूरी येथील रहिवासी होता. तर मयूर खरवडे असे जखमीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ब्रम्हपुरी नागभीड मार्गाने ब्रम्हपूरी प्रबुद्ध नगरातील निवासी अक्षय कविश्वर दहिवले (वय ३०) व मयूर वसंतराव खरवडे (वय ३०) हे दोघेही एम.एच. ३४ बिझेड ७९६३ या क्रमांकाच्या दुचाकीने जाते होते. नागभीड पोलीस स्टेशन अंतर्गत किरमिटी (मेंढा )गावाजवळ दुचाकीला अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. यामध्ये अक्षय हा जागीच ठार झाला. तर मयूर हा गंभीर जखमी झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार रत्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडून होते. त्यापैकी मयूर याला नागरिकांनी एका खासगी रूग्णालयात तत्काळ भरती केले. त्यामुळे त्याचा जीव वाचला आहे.

नागभीड पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला असून अज्ञात वाहनाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button