मुंबई : मित्राला सोडायला आलेल्‍या तरूणावर बिबट्याचा हल्‍ला

मुंबई : मित्राला सोडायला आलेल्‍या तरूणावर बिबट्याचा हल्‍ला

जोगेश्वरी; पुढारी वृत्‍तसेवा : मित्राला घरी सोडायला आलेल्‍या तरूणावर बिबट्याने प्राणघातक हल्‍ला केल्‍याचा प्रकार समोर आला आहे. आरे दुग्ध वसाहतीतील युनिट क्रमांक ७ या ठिकाणी राहणाऱ्या अभिषेक भारद्वाज या आपल्या मित्राला सोडावयास आलेल्या राजेश रावत (वय १९) या तरुणावर बिबट्याने प्राणघातक हल्‍ला केला. रात्री नऊच्या दरम्यान ही घटना घडली. सदर तरुणाला ट्रामा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

या विषयी अधिक माहिती अशी की, युनिट नं ७ येथे फिल्म सिटी रोड पंजाब ढाबा सुनील मैदान येथे आपल्या मित्राला सोडण्यास आलेल्या संतोष नगर येथील तरुणावर बिबट्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्‍ल्‍यात संबंधीत तरूण गंभीर जखमी झाला आहे.

चित्र नगरीतील संपूर्ण परिसर हा जंगलाने व्यापलेला आहे. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बिबट्यांचे दर्शन होते. हा परिसर गर्द झाडीने व्यापलेला आहे. तेथील रस्त्यावरून प्रवास करताना अनेकवेळा बिबट्याचे दर्शन होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news