Kantara Movie : ‘कांतारा’च्या दिग्दर्शक-निर्मात्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा | पुढारी

Kantara Movie : 'कांतारा'च्या दिग्दर्शक-निर्मात्याला सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सुप्रीम कोर्टाने कांतारा (Kantara Movie ) चित्रपटाचे निर्माते विजय किरगंडूर आणि अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी यांना कॉपीराईट उल्लंघन प्रकरणी दिलासा दिला आहे. सध्या या चित्रपटातील गाणे ‘वराहरुपम’ हटवले जाणार नाही. सिव्हिल कोर्टाचा आदेश येईपर्यंत गाणे हटवण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तसेच म्हटले आहे की, १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी जेव्हा ते गाण्यावरील कॉपीराईट उल्लंघना संदर्भात चौकशीसाठी हजर असतील तेव्हा त्यांना अटक केली जाणार नाही. सुप्रीम कोर्टाने नोटीस जारी करून पक्षकारांकडून उत्तर मागितले आहे. (Kantara Movie )

काय आहे प्रकरण?

सुपरहिट कन्नड चित्रपट ‘कांतारा’मधील गाणे ‘वराहरूपम’वर सुप्रीम कोर्टात सुनावणी होत आहे. केरळचा बँड ताईकुडम ब्रिजने प्लॅजरिज्मने आरोप केला आहे की, त्यांचे गाणे ‘नवरसम’पासून वराहरुम कॉपी करण्यात आले आहे. यानंतर ‘वराहरूपम’ चा व्हिडिओ यूट्यूबवरून डिलीट करण्यात आला. पण चित्रपटातून हटवण्यात आला नाही.

Back to top button