Kriti Sanon : प्रभाससोबतच्या अफेअरवर क्रितीने दिला पुर्णविराम; म्हणाली... | पुढारी

Kriti Sanon : प्रभाससोबतच्या अफेअरवर क्रितीने दिला पुर्णविराम; म्हणाली...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राच्या लग्नानंतर लवकरच आणखी एका बॉलिवूडमधील कपल लग्न बंधनात अडकणार असल्याची चर्चा रंगू लागली. बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनॉन आणि बाहूबली फेम प्रभास याच्या साखरपुड्याची चर्चांना उधाण आलं आहे. या वृत्ताला मध्यंतरी प्रभासच्या टिमने केवळ अफवा असल्याची माहिती दिली होती. यानंतर आता क्रितीने ( Kriti Sanon ) स्वत: याबाबतची माहिती देत पूर्णविराम दिला आहे.

आगामी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टिझरनंतर क्रिती आणि प्रभास दोघांच्या डेटिंगची वृत्त सोशल मीडियात रंगू लागले होते.  क्रितीआणि प्रभास लवकरच लग्न करणार असून दोघांचा साखरपुडा मालदीवमध्ये पार पडणार असल्याची माहिती एका रिपोर्टनुसार मिळाली होती. दोघांकडून  याबाबतची अधिकृत माहिती समोर आली नव्हती. यादरम्यान मात्र, प्रभासच्या टिमने केवळ ही अफवा असून दोघेजण चांगले मित्र असल्याचा खुलासा केला होता. आता क्रितीने स्वत: सोशल मीडियावर भडकत या घटनेला पूर्णविराम दिला आहे.

नुकतेच क्रितीने ( Kriti Sanon ) तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अमेरिकन अभिनेत्री ओपरा विनफ्रे दिसत असून यावेळी ती म्हणली आहे की,  “लोकांना काय बोलायचे आहे ते बोलू देत. पण, आपण स्वत: साठी काय आहोत हे जाणले पाहिजे. तुम्ही एखाद्या परिस्थितीवर कशी मात करता यावर सगळं काही अवलंबून असते. लोकांच्या बोलणे ऐकले तर निराशा येते. म्हणून त्याचे ऐकत बसू नका. जे आहे ते स्वीकारा आणि सोडून द्या. या सगळ्यात तुम्ही अडकत जाता आणि नंतर तुमचा वेळ आणि शक्ती फूकट खर्च होते.” याशिवाय क्रितीने या पोस्टवर ‘Word’ आणि एक सॅल्यूट इमोजी शेअर केला आहे. यावरून सोशल मीडियावरील सर्वच अफवा असल्याचे निदर्शनास येत आहे.

याआधी प्रभासच्या टीमने प्रभास आणि क्रितीच्या लग्नाच्या अफवा फेटाळून लावत दोघेजण चांगले मित्र असल्याचा खुलासा केला होता.
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, प्रभास लवकरच ओम राऊतचा ‘आदिपुरुष’, प्रशांत नीलचा ‘सालार’, नाग अश्विनचा ‘प्रोजेक्ट के’, मारुती यांचा ‘राजा डिलक्स’ आणि संदीप रेड्डी वंगाचा ‘स्पिरिट’ या चित्रपटात दिसणार आहे. तर दुसरीकडे, क्रिती सेनॉनकडे कार्तिक आर्यनसोबतचा ‘शेहजादा’, टायगर श्रॉफसोबतचा ‘गणपथ’, विशाल भारद्वाजचा ‘चुरिया’ चित्रपटात दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

Back to top button