‘पास आऊट’ लघुपटाचा ‘रिफ 2023 फेस्टिव्हल’ मध्ये डंका

पासआऊट लघुपट
पासआऊट लघुपट
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'सैराट' आणि 'मूळशी पॅटर्न' फेम अभिनेते सुरेश विश्वकर्मा आणि त्यांच्या जोडीला अभिनेत्री पायल कबरेची मुख्य भूमिका असलेला आणि दिग्दर्शक राहुल दिलीप सूर्यवंशी दिग्दर्शित "पास आऊट" या लघुपटाची चर्चा सर्वत्र सुरू आहे. गेल्या काही महिन्यांपासून अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात प्रथम पारितोषिकाने विजय पटकावून या लघुपटाने चांगलीच बाजी मारली.

'पास आऊट' लघुपटाला यंदाच्या मानाच्या नवव्या 'राजस्थान इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल रिफ २०२३'च्या फिल्म फेस्टिवलमध्ये या एकमेव मराठी लघुपटाची स्क्रीनिंगसाठी निवड झाली होती. या महोत्सवात "पास आऊट"ला सर्वोत्कृष्ट प्रादेशिक लघुपट हा पुरस्कार देऊन सन्मानितही करण्यात आले. 'रीफ इंटरनॅशनल फ्लिम फेस्टिवल' सोबतच 'इंडियन इंटरनॅशनल फिल्म अवॉर्ड्स', 'गोल्डन स्पॅरो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल टिफ', 'मड हाऊस इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवल' मध्ये "पास आऊट" या लघुपटाने प्रथम पारितोषिक पटकावले.

मानाच्या युके येथील 'लिफ्ट ऑफ ग्लोबल नेटवर्क सेशन्स' येथे ही "पास आऊट"ची निवड झाली होती, ही नक्कीच वाखाणण्याजोगी बाब आहे.

"पास आऊट" या लघुपटाची कथा कविता निकम या व्यक्तीवर आधारित आहे. कविता या पात्राने तांत्रिक अभियंता म्हणून शिक्षण पूर्ण केले आहे . तिच्या या करिअरच्या निवडीच्या निर्णयाभोवती ही संपूर्ण कथा फिरतेय. तांत्रिक अभियांत्रिकी ही पुरुषप्रधान व शारिरीक श्रमाची अपेक्षा करणारी फिल्ड असूनही कविता त्यात करिअर घडवण्याच्या हेतूने खडतर मेहनत घेऊन, उत्तीर्ण होऊन प्रत्यक्ष मुलाखतीला सामोरे जाते. अशाच एका मुलाखतीतील प्रसंगावर "पास आऊट" हा लघुपट भाष्य करतो.

पास आऊटचे लेखन, संकलन आणि दिग्दर्शनाची धुरा राहुल दिलीप सूर्यवंशी यांनी पेलवली आहे. तर लघुपटाला पार्श्वसंगीत अभिजीत सोनावणे यांनी दिले आहे. तर ध्वनीमुद्रणाची जबाबदारी अतुल गायकवाड यांनी सांभाळली आहे. तर या 'पास आऊट' लघुपटाला धनराज वाघ यांनी त्यांच्या कॅमेऱ्यात कैद केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news