Bigg Boss 16 : फिनाले आधी जयने केला विजेत्याच्या नावाचा खुलासा

Jay bhanushali
Jay bhanushali
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्हीचा चर्चित रिॲलिटी शो बिग बॉसचा विजेता कोण होणार का, (Jay bhanushali ) याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. (Bigg Boss 16) आता टेलिव्हिजन अभिनेता आणि अँकर जय भानुशाली (Jay Bhanushali) ने सार्वजनिकपणे बिग बॉसच्या निर्मात्यांवर निशाणा साधला. त्याचबरोबर या सीझनच्या विजेत्याचे नावदेखील सांगितले. (Bigg Boss 16)

एका मुलाखतीत जय भानुशालीला प्रश्न उपस्थित करण्यात आला होता की, अखेर बिग बॉस १६ चा विजेता कोण असेल. यावर उत्तर देताना जय भानुशालीने बिग बॉस निर्मात्यांवर निशाणा साधत शो विषयी प्रश्न उपस्थित केले होते. जय भानुशालीला विचारण्यात आलं की, अर्चना गौतम (Archana Gautam), शिव ठाकरे (Shiv Thakare), एमसी स्टॅन (MC STan) आणि प्रियंका चौधरी (Priyanka Choudhary) यांच्यापैकी कोण बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकणारा असेल. यावर जय भानुशालीला थेट विचारण्यात आलं की, या सीझनचा कोण विजेता होणार? रिपोर्टरने प्रियंकाचे नाव घेतलं. त्यानंतर भानुशाली म्हणाला-ती शो जिंकेल. नाही तर शिव जिंकू शकतो.

बिग बॉस १० च्या फिनालेला केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. सोशल मीडियावर प्रियंका, शिव एवं एमसी स्टॅन (MC Stan) यांच्या मध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळत आहे. सोशल मीडिया चर्चा आहे की, एमसी स्टॅन वोटिंगमध्ये प्रियंका आणि शिव या दोघांपेक्षा पुढे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news