Sidharth-Kiara : ३ दिवसांत खर्च केले इतके कोटी, ‘या’ कपलनी लग्नात पाण्यासारखा ओतला पैसा | पुढारी

Sidharth-Kiara : ३ दिवसांत खर्च केले इतके कोटी, 'या' कपलनी लग्नात पाण्यासारखा ओतला पैसा

पुढारी ऑनलाईन डेस्क : सिद्धार्थ मल्होत्रा-कियाराच्या लग्नाचे विधी सुरु आहेत. (Sidharth-Kiara ) आज ७ फेब्रुवारी, २०२३ रोजी सात फेरे घेणार आहेत. राजस्थानमधील जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये हे बॉलिवूड कपल सात फेरे घेत आहे. रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ-कियारा (सिद्धार्थ कियारा वेडिंग) यांनी आतापर्यंत त्यांच्या लग्नात करोडो रुपये खर्च केले आहेत. सिद्धार्थ-कियारापूर्वी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी त्यांच्या लग्नात पाण्यासारखे पैसे ओतले आहेत. (Sidharth-Kiara)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

रिपोर्ट्सनुसार, सिद्धार्थ कियाराने त्यांच्या लग्नात आतापर्यंत ६ कोटी रुपये खर्च केले आहेत. सूर्यगडमध्ये एका दिवसाच्या लग्नाचा खर्च १.५ कोटी ते २ कोटींपर्यंत आहे. याच अंदाजानुसार तीन दिवसांचा खर्च सहा कोटी रुपये होतो.

रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना कैफ आणि विकी कौशलने राजस्थानमध्येच डेस्टिनेशन वेडिंगही केलं होतं. सवाई माधोपूरच्या सिक्स सेन्स फोर्टमध्ये लग्न करण्यासाठी विकी-कॅटरिनाला सुमारे ४ कोटी खर्च करावे लागले.

रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचे इटलीतील एका पॅलेसमध्ये लग्न झाले. या लग्नात दोघांनी करोडो रुपये खर्चही केले. रिपोर्ट्सनुसार, रणवीर-दीपिकाचे लग्न झालेल्या रिसॉर्टमध्ये एका दिवसाचा खर्च २४ लाख रुपये आहे.

रिपोर्टनुसार, अनुष्का शर्मा-विराट कोहलीने त्यांच्या लग्नात जवळपास १०० कोटी रुपये खर्च केले होते.

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांचे राजस्थानमधील उम्मेद भवन येथे लग्न झाले. रिपोर्ट्सनुसार, प्रियांका आणि निक जोनासने त्यांच्या लग्नासाठी सुमारे ५ लाख अमेरिकन डॉलर्स खर्च केले आहेत.

Back to top button