Bigg Boss 16 Finale : टॉप 3 कंटेस्टेंटची नावे समोर, हे खेळाडू पैसे घेऊन...

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस १६ च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये एका कंटेस्टेंटला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. सुम्बुल तौकीर खान नंतर बिग बॉसच्या घरातून निमृत कौर अहलुवालियाला बाहेर काढण्यात आले आहे. निमृतला बाहेर काढल्यानंतर, बिग बॉसच्या (Bigg Boss 16 Finale) घरात प्रियंका चौधरी, शिव ठाकरे, एमसी स्टॅन, अर्चना गौतम आणि शालिन भानोत हे पाच सदस्य शिल्लक आहेत. आता टॉप ५ नंतर टॉप ३ स्पर्धकांची नावे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Bigg Boss 16 Finale)
बिग बॉस १६ च्या अपडेटनुसार, टॉप ३ स्पर्धक प्रियंका चौधरी, शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन असणार आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या वृत्तांनुसार, अर्चना गौतमला टॉप ४ मध्ये देखील स्थान मिळणार नाही. शालिन भानोट बिग बॉसमध्ये टॉप ४ मध्ये जाईल. पण फिनालेच्या दिवशी तो पैशांनी भरलेली ब्रीफकेसची निवड करून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल.
विजेत्याबद्दल सोशल मीडियावर वाद
बिग बॉस १६ च्या विजेत्याबाबत सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. प्रियांका चौधरी (बिग बॉस १६ ची विजेती प्रियांका) बद्दल असे बोलले जात आहे की, चॅनेल तिच्याशी भेदभाव करत आहे आणि बाकीच्या स्पर्धकांकडे दुर्लक्ष करत आहे. दुसरीकडे, एमसी स्टॅनचे बिग बॉसच्या सोशल मीडियावर जबरदस्त फॅन-फॉलोईग आहे, ज्यांनी त्याला फिनालेपर्यंत आणले आहे. आता असे म्हटले जात आहे की शिव किंवा प्रियांका नाही तर एमसी स्टॅन बिग बॉस १६ ची ट्रॉफी जिंकणार आहे.
हेदेखील वाचा-
- Prajakta Mali : काही तरी जादू आहे प्राजक्ताच्या रुपात❤️; म्हाळसा लूकची चर्चा
- नवा गडी नवं राज्य : आनंदी-राघवसोबत साजरा करूया प्रेमाचा आठवडा!
- Shivani Baokar : ‘समोरचा जेवढा खट, अस्मी तेवढीच तिखट’, शितलीची नवी मालिका
View this post on Instagram
View this post on Instagram