Prajakta Mali : काही तरी जादू आहे प्राजक्ताच्या रुपात❤️; म्हाळसा लूकची चर्चा  | पुढारी

Prajakta Mali : काही तरी जादू आहे प्राजक्ताच्या रुपात❤️; म्हाळसा लूकची चर्चा 

पुढारी ऑनलाईन डेस्क : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी ( Prajakta Mali ) छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोचे सूत्रसंचालन करत आहे. प्रसाद खांडेकर, पंढरीनाथ कांबळे, विशाखा सुभेदार, ओंकार भोजणे यांच्यासह अनेक कलाकार शोमधून चाहत्यांना खळखळून आणि पोट धरून हसवतात. प्राजक्ता (Prajakta Mali ) तिच्या अभिनयासोबत नवनवीन फॅशन सेन्सनं चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. सध्या तिचा आणखी एका म्हाळसा लूकनं चाहत्यांना भूरळ घालत आहे. या तिच्या व्हिडिओवर चाहत्यांनी भरभरून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

अभिनेत्री प्राजक्ता माळीने ( Prajakta Mali ) नुकतेच तिच्या ‘प्राजक्तराज पारंपरिक मराठी साज’ या दागिन्याच्या कलेक्शनला महिना पूर्ण झाला आहे. या निमित्ताने प्राजक्ताने खास अशा म्हाळसा लूक समोर आला आहे. यावेळी प्राजक्ताने आकाशी रंगाच्या सहावारी साडीवर ब्लॅक कलरचे स्लिव्हलेस ब्लाऊज परिधान केले आहे. पायात पैजण, गळ्यात दागिने, हातात बांगड्या, कमरेला कमरपट्टा, नाकात नथ, कानात सिल्व्ह रंगाची कर्णफुले, कपाळावर चंद्रकोर, केसांचा अंबाडा, बाजूबंद, मेकअप अणि लिपस्टिकने तिने तिचा लूक पूर्ण केला आहे. प्राजक्ताचा हा लूक चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.

या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने ‘म्हाळसा, बरेच जण website वर सोनसळा बघून जातायेत. पुढे म्हाळसा आणि तुळजा पण आहे. Don’t miss it..🎯. Celebrating 1 month to the @prajaktarajsaaj असे लिहिले आहे. या व्हिडिओत प्राजक्ताच्या पाठीमागे हिरवीगार झाडी लक्ष वेधून घेत आहे. यावेळचे तिचे लाजणं आणि हासणं याने चारचाँद लावले आहेत. या व्हिडिओच्या बॅकग्रांऊडला मराठी गाणे ‘केवड्याचं पान तू, कस्तुरीचं रानं तू, पाहूळल्या जीवाचं पानं तू, सागराचं गाजं तू, गाळावर लाज तू, आतुरल्या डोळ्याचं सपान तू.’ वाजत आहे.

प्राजक्ताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच चाहत्यांसह मराठी कलाकरांनी कॉमेन्टसचा पाऊस पाडला आहे. यात मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ‘Pretty 😍’ असे लिहिले आहे. एका युजर्सने ‘ऐवढं कोणी सुंदर असावं का?’, ‘Wonderful ❤️❤️❤️’, ‘गावरान अंडी तळली तुपात,काही तरी जादु आहे “प्राजक्ता”च्या रुपात….❤️’, ‘Khup goad distyes Prajakta 😍👌👌’, ‘😍 मनमोहक’, ‘शिंपल्याचे show piece नको… जीव अडकला प्राजक्तात…😍’, ‘आई शपथ किती सुंदर दिसतेस ♥️🌹😍😍 बापरे क्षणभर सुद्धा पापण्या बंद होत नाहीत 😍😍’, ‘आवडली आम्हाला म्हाळसा ❤️’, ‘😍beautiful 💖’, ‘Wonderful ❤️’, ‘😍 मनमोहक’, ‘आता जीव घेणार का आमचा 😍❤’, ‘रुपसुंदरी 😍’, ‘Wow किती गोड,लय भारी❤️’, ‘झक्कास, बिनधास्त ❤️’, ‘🔥❤️❤️ एक नंबर’, ‘Very very beautiful……🔥’, ‘का नाही मोह करावा तुझ्या एका कटाक्षाचा मी.. दंग होई कुणी असा तुझा साज….. मखमली गालाला नथनीचा बाज….. ❤️❤️❤️❤️’, ‘अलौकिक सौंदर्य’ , ‘Osm😍😍❤️❤️’. यासारख्या अनेक कॉमेन्टस केल्या आहेत.

तर काही नेटकऱ्यांच्या हार्ट आणि फायर ईमोजींनी कॉमेन्टस सेक्शन बॉक्स भरला आहे. या व्हिडिओला २ तासांत ५० हजारांहून अधिक जणांनी लाईक्स केलं आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

 

View this post on Instagram

 

A post shared by Prajaktta Mali (@prajakta_official)

Back to top button