Pathaan box office :'पठाण'ने 'दंगल'च्‍या कमाईचा सात वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत! | पुढारी

Pathaan box office :'पठाण'ने 'दंगल'च्‍या कमाईचा सात वर्षांपूर्वीचा विक्रम काढला मोडीत!

 पुढारी ऑनलाईन डेस्क :

‘पठाण चित्रपटाच्‍या कमाईत सुरु असणारी वाढ कायम आहे. या (Pathaan Worldwide Collection ) चित्रपटाने आपल्या नावावर आणखी एक रेकॉर्ड केला आहे. या कामगिरीमुळे पठाणने दंगल चित्रपटाचा सात वर्षांपूर्वीचा कमाईचा विक्रम मोडला आहे. पठाण लवकरचं हजार कोटींच्या कमाई करण्याची शक्यता आहे. वाचा सविस्तर बातमी.  (Pathaan box office)

Pathaan box office
Pathaan Movie

११ व्या दिवशीही विक्रमी वाटचाल

पठाणने ११ व्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सुमारे २१-२३ कोटींची कमाई केली.  ११ दिवसांच्या कमाईनंतर देशात ४०० कोटींच्या नेट क्लबमध्ये प्रवेश करणारा हा पहिला बॉलिवूड चित्रपट बनला आहे, त्यामुळे पठाणने दंगलचा ३८७ कोटी कमाईचा सात वर्षांचा विक्रम मोडला आहे.

बॉलिवूडचा २०२३ चा पहिला ब्लॉकबस्टर ‘पठाण’ रोज नवनवे धमाके करत आहे. शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने बॉलीवूडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला असून. गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्री वाईट टप्प्यातून जात आहे. बॉलीवूड चित्रपटांचे बॉक्स ऑफिस आता ‘पठाण’मुळेच जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे. या चित्रपटाने अवघ्या काही दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

Pathaan box office : परदेशात ‘पठाण’चा डंका

२५ जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये पठाण चित्रपट प्रदर्शित झाला होता. ‘पठाण’ने अवघ्या काही दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत. रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासून चांगली कामगिरी केली आहे. पठाण या आठवड्याच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई करू शकतो.

‘पठाण’मध्ये शाहरुख रॉ एजंटच्या भूमिकेत

सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा एक हेरगिरी थ्रिलर चित्रपट आहे. यामध्‍ये शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात शाहरुख खान पठाण नावाच्या रॉ फील्ड एजंटच्या भूमिकेत दिसत आहे, तर जॉन खलनायकाच्या भूमिकेत आहे.

हेही वाचा : 

Back to top button