Pathaan: गाणं चोरी करून बनवलंय ‘बेशरम रंग’? पाकिस्तानी गायक सज्जाद अलीचा आरोप (Video) | पुढारी

Pathaan: गाणं चोरी करून बनवलंय ‘बेशरम रंग’? पाकिस्तानी गायक सज्जाद अलीचा आरोप (Video)

पुढारी ऑनलाईन डेस्क : शाहरुख खानचा चित्रपट ‘पठान’चा (Pathaan) वाद संपत नाही. ‘बेशरम रंग’मध्ये दीपिका पादुकोणच्या बिकिनीच्‍या रंगावरुन वाद झाला. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाच्या निर्मात्यांना गाण्यातील (Pathaan) दृश्यांमध्ये बदल करण्याचा सल्ला दिलाय. आता पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने ‘बेशरम रंग’ हे गाणे चोरी केल्याचा आरोप केला आहे. ‘पठान’ या बॉलिवूडपटातील बेशरम हे रंग पाकिस्तानी गाणे चोरी करून बनवल्याचा आरोप त्याने व्हिडिओच्या माध्यमातून केला आहे. (Video)

‘बेशरम रंग’ वाद शिगेला

पाकिस्तानी गायक सज्जाद अलीने नाव न घेता ‘बेशरम रंग’ वर निशाणा साधला आहे. त्यांनी एक व्हिडीओ शेअर करत ‘बेशरम रंग’ गाणे २६ वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या आपल्या गाण्यासारखेच असल्याचे म्हटलं आहे.

पाकिस्तानी गायिका सज्जाद अली याने नाव न घेता ‘बेशरम रंग’वर निशाणा साधला आहे. ‘बेशरम रंग’ हे गाणे ‘अब के हम बिछडे’ शी मिळतेजुळते असल्याचे त्याने म्हटले आहे. सज्जाद अलीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे की, येणाऱ्या चित्रपटातील एक गाणं ऐका, जे ऐकताच त्यांना खूप वर्षांपूर्वी लिहिलेल्या गाण्याची आठवण झाली.

सज्जाद अलीने व्हिडिओमध्ये नाव तर घेतलं नाही. पण, सोशल मीडिया युजर्सचं म्हणणं आहे की, त्यांचा इशारा ‘पठान’मधील गाणे ‘बेशरम रंग’कडे आहे. यूजर्स कमेंट करून आपल्या प्रतिक्रियादेखील देत आहेत. एकाने लिहिलं, ‘बेशरम रंग सज्जाद अलीच्या म्युझिक कम्पोझिशनवर आधारित आहे.’ याशिवाय काही लोकांचे म्हणणे आहे की, दोघांचे गाणे एकदम वेगळे आहेत. ‘बेशरम रंग’ याची कॉपी नाही. शाहरुख खानचा चित्रपट ‘पठान’ २५ जानेवारी रोजी चित्रपटगृहात पाहता येणार आहे. चित्रपटात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहमदेखील दिसणार आहे.

हेही वाचा : 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sajjad Ali Official (@thesajjadali)

Back to top button