Akshay Kumar : अक्षय कुमारचे दुश्मन 'हे' पाच सुपरस्टार ! | पुढारी

Akshay Kumar : अक्षय कुमारचे दुश्मन 'हे' पाच सुपरस्टार !

पुढारी ऑनलाईन डेस्क : बाॅलिवुडचा आघाडीचा अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच्या फिटनेस आणि सिनेमांमुळे नेहमीचे चर्चेत असतो. पण, त्याच्या पर्सनल लाईफमुळेही तो सातत्याने चर्चेत राहत असतो. तसं पाहिलं तर अक्षय कुमार हा विनोदी वृत्तीचा आणि सर्वांनी हसत-खेळत राहणार अभिनेता म्हणून ओळखला जातो. पण, बाॅलिवुडमध्ये त्याचेही काही दुश्मन आहेत आणि हे दुश्मन साधेसुधे नाहीत. तर हेदेखील बाॅलिवुडमधील नावाजलेले कलाकार आहे. चला तर आज अक्षय कुमारचे शत्रू कोण, हे पाहू या…

salman khan

सलमान खान : तसं पाहिलं तर सलमान खान हा अनेक कलाकारांनाच दुश्मन असल्याच्या चर्चा होत असतात. त्यात तो अक्षय कुमारचाही दुश्मन आहे. मीडिया रिपोर्ट्स असं सांगतात की, सलमान खान आणि अक्षय कुमारचं भांडण हे अक्षयची पत्नी ट्विंकल खन्नावरून झाली आहेत.

ajay devgan

अजय देवगण : अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि अजय देवगणची दुश्मनी जगजाहीर आहे. त्यांचे एकमेकांशी पटत नाही. अजय देवगणचा अक्षयवर असा आरोप होता की, राजकुमार संतोषीच्या चित्रपटातील माझं सीन तो हटवतो. त्यानंतर दोघांच्यात मोठी वादावादी झाली. अक्षयनेदेखील अक्षय कुमारवर आरोप केले.

sunny deol

सनी देओल : अक्षय कुमार आणि सनी देओल यांच्यातील नातं काही खास नाही. ‘जिद्दी’, या चित्रपटात दोघांनीही काम केलेले होते. पण, रविना टंडन हिच्यावरून दोघांच्यात मोठी भांडणं झाली. त्यावरून दोघांच्यात दुश्मनी कायम आहे.

john abraham

जाॅन अब्राहम : ‘हाऊसफुल-२’ या चित्रपटाच्या चित्रकरणाच्या सेटवर जाॅन अब्राहम आणि अक्षय कुमारची मोठी भांडणं झाली होती. ही भांडणं इतकी मोठी झाली की, त्यांच्यामध्ये दोघांच्या बाॅडीगार्ड्सना मध्यस्ती करावी लागली. या भांडणात अक्षय कुमार जाॅनच्या अंगावर गेला होता.

Farah khan

फराह खान : ‘जोकर’ या फराह खानच्या चित्रपटापासून अक्षय कुमार आणि फराहमध्ये दुश्मनी वाढली. असं सांगितलं जातं की, जोकर हा चित्रपट थ्रीडी होणार आहे, असं अक्षयला सांगण्यात आला होता. पण, प्रत्यक्षात तो चित्रपट थ्रीडी नव्हता. त्यामुळे अक्षय नाराज झाला आणि त्याने त्या चित्रपटाचा प्रोमो केला नाही. त्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी अक्षयने सांगून टाकले की, इथून पुढे फराह खानचा एकही चित्रपट करणार नाही.

पहा व्हिडीओ : डिंपल को सिम्पल नहीं समझनेका! देवमाणूस फेम अस्मिता देशमुख बरोबर खास गप्पा!

Back to top button