Athiya-KL Rahul : अथिया-राहुल लग्नानंतर पहिल्यांदाच डिनर डेटवर

kl rahul-athiya shetty
kl rahul-athiya shetty

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी आणि अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल (Athiya-KL Rahul) यांचा २३ जानेवारी रोजी विवाह झाला होता. त्यानंतर दोघांनी पापाराझींसमोर क्लिक केलेले फोटो पाहायला मिळाले. तथापी, आता एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये कपल डिनर डेटवरून परतताना दिसत आहेत. लग्नानंतर हे जोडपे पहिल्यांदाच एकत्र दिसले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये अथियाच्या चेहऱ्यावर ग्लो दिसत आहे. अथियाच्या सौंदर्याचे कौतुकदेखील केले जात आहे. (Athiya-KL Rahul)

लग्नानंतर पहिल्यांदाच दिसले जोडपे

पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अथिया शेट्टी आणि केएल राहुल डिनर डेटचा आनंद घेतल्यानंतर निघताना दिसत आहेत. यादरम्यान, अथियाच्या हातात तिच्या लग्नाच्या अंगठीसोबत मेंहंदीही दिसत आहे. कॅज्युअल लूकमध्ये, अथियाने फ्लेर्ड डेनिमसह गडद निळ्या रंगाचा प्रिंटेड शर्ट घातला होता. तर राहुल डेनिम आणि पांढरा शर्ट परिधान केलेला दिसत होता. यामुळे सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर चाहत्यांनीही कमेंट करत लिहिले, 'तिची त्वचा ग्लो करत आहे.'

अथिया आणि केएल राहुलने सुनील शेट्टीच्या खंडाळा फार्म हाऊसवर लग्न केले. नव्हते. आता अभिनेत्री अथिया तिच्या इन्स्टाग्रामवर एकामागून एक लग्नाचे नवीन फोटो पोस्ट करत आहे. अथिया शेट्टीने तिच्या मेहेंदी समारंभाचे काही फोटोजही शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news