Priyanka Chopra : प्रियांकाने अखेर दाखवला नन्ही परीचा चेहरा, मालती सेम...

पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रियांका चोप्राने अखेर तिच्या नन्ही परीचा चेहरा दाखवला आहे. (Priyanka Chopra) प्रियांका चोप्राने तिच्या मुलीचे अनेक फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत. मात्र त्यामध्ये तिची मुलगी मालतीचा चेहरा दिसला नाही. पण आता अभिनेत्रीने स्वतः इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मुलगी मालती मेरीचा चेहरा दिसत आहे. (Priyanka Chopra)
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत आपला ठसा उमटवणारी अभिनेत्री प्रियांका चोप्रा अनेकदा आपली मुलगी मालतीचा चेहरा लपवताना दिसते. मात्र अखेर अभिनेत्री कन्येचा चेहरा दाखवण्यात आला आहे. वास्तविक, अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये मालतीचा चेहरा दिसत आहे.
प्रियांकाने लॉस एंजेलिसमधील एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. तिथे तिचा पती आणि गायक निक जोनासदेखील उपस्थित होता. यावेळी प्रियांका मुलगी मालतीसोबत पहिल्या रांगेत बसून निकसाठी चिअर करताना दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये मालतीचा चेहरा स्पष्टपणे दिसत आहे, ज्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. अभिनेत्री आणि तिच्या मुलीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मालतीला पाहून चाहते खूप सारे कमेंट्स देत आहेत. प्रियंका चोप्राने काही तासांपूर्वी शेअर केलेला हा व्हिडिओ पाहून चाहते आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.
एका यूजरने लिहिले, अरे बाळाचा चेहरा दाखवला आहे. दुसर्याने लिहिले, शेवटी बाळाची झलक मिळाली. खूप गोंडस. तिसर्याने लिहिले, हे कुटुंब खूप गोड आहे. तसेच प्रियांकाच्या या पोस्टवर चाहत्यांनी हार्ट इमोजी शेअर केले आहेत.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी १ आणि २ डिसेंबर, २०१८ मध्ये ख्रिश्चन आणि हिंदू रितीरिवाजानुसार लग्न केले होते. त्यानंतर गेल्या वर्षी सरोगसीद्वारे मुलीच्या जन्माची बातमी चाहत्यांशी शेअर करण्यात आली होती.
- Pathaan Worldwide Collection : ‘पठाण’ने गाठला ६०० कोटींचा आकडा
- कोल्हापूर : मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या ‘त्या’ शिक्षकास अटक, मुख्याध्यापकांकडून फिर्याद
- नाशिक : सिडको विभागात उद्या पाणीपुरवठा बंद
View this post on Instagram
View this post on Instagram