पुढारी ऑनलाईन डेस्क : 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 'पठाण' (Pathaan Worldwide Collection ) चित्रपट लवकरच १ हजार कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल अशी अपेक्षा आहे. अशा परिस्थितीत 'पठाण'च्या सहाव्या दिवसाच्या वर्ल्डवाईड कलेक्शनची आकडेवारीही समोर आली आहे. (Pathaan Worldwide Collection)
बॉलिवूडचा २०२३ चा पहिला ब्लॉकबस्टर 'पठाण' रोज नवनवे धमाके करत आहे. शाहरुख खान स्टारर या चित्रपटाने बॉलीवूडला बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातल्याचे दिसते. गेल्या दोन वर्षांपासून बॉलिवूड इंडस्ट्री वाईट टप्प्यातून जात आहे. बॉलीवूड चित्रपटांचे बॉक्स ऑफिस आता केवळ 'पठाण'मुळेच जगभरात प्रसिद्धी मिळवत आहे. या चित्रपटाने अवघ्या सहा दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर कमाई करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. 'पठाण'च्या कलेक्शनमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. 'पठाण'च्या सहाव्या दिवसाच्या वर्ल्डवाइड कलेक्शनचे आकडेही समोर आले आहेत. त्यात पुन्हा एकदा १०० कोटींची वाढ होताना दिसत आहे.
२५ जानेवारी रोजी हिंदी, तमिळ आणि तेलुगू भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित झालाय. 'पठाण'ने अवघ्या सहा दिवसांत जगभरातील बॉक्स ऑफिसवर ६०० कोटी रुपयांचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, बॉक्स ऑफिसवर सुरुवातीच्या आठवड्यात चांगली कामगिरी केल्यानंतर, जेव्हा 'पठाण' सोमवारची परीक्षा देण्यासाठी मैदानात उतरला, तेव्हा या चित्रपटाला यातही चांगले यश मिळाले. पठाण या आठवड्याच्या अखेरीस बॉक्स ऑफिसवर १००० कोटींची कमाई करू शकतो.
सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण हा एक हेरगिरी थ्रिलर चित्रपट आहे, ज्यात शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात सलमान खानही कॅमिओ करताना दिसत आहे. चित्रपटात शाहरुख खान पठाण नावाच्या रॉ फील्ड एजंटच्या भूमिकेत दिसत आहे, तर जॉन खलनायकाच्या भूमिकेत आहे.