Nora Fatehi : 'नोरावर सुकेशचे गंभीर आरोप; म्हणाला, जॅकलीनवर...' | पुढारी

Nora Fatehi : 'नोरावर सुकेशचे गंभीर आरोप; म्हणाला, जॅकलीनवर...'

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही (Nora Fatehi) आरोपी सुकेश चंद्रशेखरसह २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे सध्या चर्चेत आहे. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी सुकेश चंद्रशेखरने कोर्टातून त्याच्या वकिलामार्फत एक पत्र पाठवून नोरा फतेहीवर गंभीर आरोप केले आहेत.

चंद्रशेखरने नोरा दिवसातून दहा वेळा फोन करून जॅकलिनच्या विरोधात भडकवत असल्याचे आणि नोरा (Nora Fatehi) तिच्यावर जळत असून ती कित्येक वेळा माझा ब्रेनवॉश करत असल्याचे म्हटले आहे. सुकेश चंद्रशेखर यांचे हे वक्तव्य समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात जॅकलिनचे नाव समोरा आल्यानंतर नोराचेही नाव पुढे आले होते. तसेच याप्रकरणी ईडीकडून नोराची चौकशी करण्यात आली होती. नंतर नोराला या प्रकरणातून क्लिन चिट मिळाली होती. मात्र, महाठग सुकेशने केलेल्या आरोपानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.

या पत्रात सुकेश चंद्रशेखरने लिहिले आहे की, ‘नोरा जॅकलिनचा नेहमी तिरस्कार करत होती आणि ती (Nora Fatehi) जॅकलीनच्या विरोधात माझे ब्रेनवॉश करत होती. नोराने जॅकलीनला सोडून दे आणि मला डेट कर अशी माझी इच्छा आहे. यासाठी ती सतत दिवसातून १०- १० वेळा फोन करायची. मी फोन करू नको, असे देखील तिला सांगितले होते. मात्र, तिने फोन करायचे बंद केलं नाही.’ असेही त्याने सांगितले आहे. इतकेच नाही तर सुकेश चंद्रशेखरने नोरावर न्यायालयात खोटे बोलल्याचा आरोपही केला आहे.

त्या पत्रात म्हटले आहे की, ‘(Nora Fatehi) नोराने न्यायालयात दावा केला आहे की, तिला कार नको होती आणि तिने ती स्वतःसाठीही घेतली नव्हती. हे मोठे खोटे आहे. कारण दोघांनी एकत्रित जाऊन कार निवडली होती. त्याचे स्क्रीनशॉट ईडीकडे उपलब्ध आहेत.’ असे म्हटलं आहे.

हेही वाचा : 

Back to top button