पुढारी ऑनलाईन : बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल पुन्हा 'गदर' या चित्रपटामुळे चर्चत आले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर गदरचा दुसरा भाग 'गदर- २' लवकरच भेटीला येणार आहे. 'गदर- २' सिनेमासाठी प्रेक्षक आणि निर्मात्यांची पहिली निवड सनी आणि अमिषा होते. दोघांना कास्ट करण्यासाठी मात्र निर्मात्यांना मोठी रक्कम मोजावी लागली आहे. 'गदर- २' साठी सनी आणि अमिषा यांनी कोट्यवधी रुपये मानधन घेतले आहे.
गदरमधील सनी आणि अमिषाची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. त्यामुळे 'गदर- २'साठी देखील निर्मात्यांनी सनी आणि अमिषा यांची निवड केली. सनीने ५ कोटी रुपये मानधन घेतले आहे. तर अमिषाने २ कोटी रुपये मानधन घेतले आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली असून चाहते सिनेमाची वाट पाहत आहेत.
सिनेमात जिते नावाच्या छोट्या मुलाची साकारणाऱ्या बालकलाकाराने चाहत्यांच्या मनात घर केलं. आता 'गदर- २' सिनेमात देखील उत्कर्ष शर्मा जिते ही भूमिका साकारताना दिसणार आहे.