Jacqueline Fernandez: 'तो माझ्या भावनांशी खेळला'; कोर्टात जॅकलीनने सुकेशविरोधात दिला जबाब | पुढारी

Jacqueline Fernandez: 'तो माझ्या भावनांशी खेळला'; कोर्टात जॅकलीनने सुकेशविरोधात दिला जबाब

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस महाठग सुकेश चंद्रशेखरमुळे चर्चेत राहिली आहे. (Jacqueline Fernandez) २०० कोटींच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामुळे जॅकलीनच्या अडचणी काही कमी होईनात. त्यामुळेचं तिला कोर्टाच्या पायऱ्या झिजवाव्या लागत आहेत. याप्रकरणी जॅकलीन १८ जानेवारीला दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पोहोचली. पण, कोर्टात तिने सुकेश चंद्रशेखर विरोधात जबाब दिला, जे ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. (Jacqueline Fernandez)

ठग सुकेश चंद्रशेखरविषयी जॅकलीनने सुकेशविषयी अनेक मोठे खुलासे करत कोर्टात सांगितले की, सुकेशने तिच्या भावना दुखावल्या आहेत. तिच्या भावनांशी तो खेळला आहे. तिचं करिअर बाद केलं आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जॅकलीन फर्नांडिसने आपला जबाब देत म्हटले की, सुकेशने स्वत: सन टीव्हीचा मालक असल्याचे सांगितले आणि दावा केला की, तामिळनाडूच्या दिवंगत मुख्यमंत्री जे. जयललिता त्याची मावशी होती. त्याचसोबत ती म्हणाली की, तिला सुकेशचं खरं नावदेखील माहिती नाहिये.

सुकेशने खोटी माहिती सांगितली

जॅकलीन ठग सुकेश चंद्रशेखर विरोधात सांगताना म्हणाली की ‘सुकेशने मला म्हटलं होतं की, तो माझ्या खूप मोठा फॅन आहे आणि मग, त्याने मला सांगितलं की, मला साऊथ इंडियामध्ये चित्रपट करायला हवेत आणि त्याच्याकडे सन टीव्हीचा मालक म्हणून अनेक प्रोजेक्ट आहेत. तो पुढे म्हणाला होता की, आपल्याला साऊथ चित्रपटांमध्ये एकत्र काम करायला हवं. सुकेशने माझी दिशाभूल केली आणि माझंकरिअर, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं.’

ED ने नोंदवलाय जॅकलीनचा जबाब

मागील वर्षी सुकेश चंद्रशेखर आणि अन्य काही व्यक्तींविरोधात २०० रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ED ने चार्जशीट दाखल केलं होतं. सुकेशने तिहार जेलमध्ये शिक्षा भोगत असताना एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून जबरदस्तीने वसुली केली होती. ED ने प्रिवेंशन ऑफ मनी लॉन्ड्रिंग ॲक्ट अंतर्गत जॅकलीनचा जबाबदेखील नोंदवला आहे. ED च्या माहितीनुसार, सुकेशच्या २०० कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रींग प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार ठरू शकते.

Back to top button