सेल्फी विथ ऐश्वर्या राय | पुढारी

सेल्फी विथ ऐश्वर्या राय

पुढारी ऑनलाईन :‘सीरियल किसर’ इमरान हाश्मी सध्या त्याच्या आगामी ‘सेल्फी’ चित्रपटामुळे चर्चेत आला आहे. राज मेहता दिग्दर्शित या कॉमेडी- ड्रामा चित्रपटात तो अक्षय कुमारबरोबर झळकणार आहे. चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले. अशातच इमरानने त्याच्या ट्विटर हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यात तो अक्षयबरोबर सेल्फीसाठी पोज देताना दिसत आहे आणि फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये ऐश्वर्या रायचे पोस्टर आहे.

हा फोटो शेअर करत त्याने तिच्या फोटोबरोबर सेल्फी घेऊ, हो ना अक्षयकुमार असे कॅप्शन दिले आहे. दरम्यान, करण जोहरच्या शोमध्ये इमरानने ऐश्वर्या रॉयला प्लास्टिक म्हटल्यावर बराच वाद झाला होता. यानंतर इमरानने ऐश्वर्याची माफीही मागितली होती.

तसेच त्याने स्वतःला अभिनेत्रीचा मोठा चाहता असल्याचेही म्हटले होते. इमरान- अक्षयचा ‘सेल्फी’ चित्रपट पुढील महिन्यात २४ फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नुसरत भरुचा आणि डायना पेंटी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

Back to top button