Amruta Dhongade : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! बिग बॉसमधून बाहेर येताच ‘मिसेस मुख्यमंत्री’ कोल्हापूरला | पुढारी

Amruta Dhongade : ज्योतिबाच्या नावानं चांगभलं! बिग बॉसमधून बाहेर येताच 'मिसेस मुख्यमंत्री' कोल्हापूरला

पुढारी ऑनलाईन डेस्क : बिग बॉस मराठी सीझन ४ हा लोकप्रिय रिॲलिटी शो संपताच मिसेस मुख्यमंत्री फेम अभिनेत्री अमृता धोंगडेने थेट कोल्हापूर गाठले. तिने कोल्हापुरात जोतिबा डोंगरावर जाऊन दर्शन घेतले. यावेळचा तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तिने सोशल मीडियावरही पोस्ट करत तिच्या कोल्हापूरच्या प्रवासाबद्दल सांगितले आहे. (Amruta Dhongade )

तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. ती या व्हिडिओला कॅप्शन लिहिते की- ”Bigg Boss मधून बाहेर आल्यावर सगळ्यात आधी कोल्हापूरला गेले घरी जंगी स्वागत झालं. कौतुक सोहळा झाला आणि त्यानंतर थेट गेले ते ज्योतिबा ला 🙏 तुम्हा सर्वांच्या support मुळे आणि ज्योतिबा च्या आशीर्वादा मुळे Bigg Boss Marathi season 4 ची finalist झाले 🙏🤗 . ज्योतिबाच्या नावानं चांगभलं 🙏🌸. #amuchigang #kolhapur #ज्योतिबाच्या_नावनं_चांगभलं . (Amruta Dhongade )

अमृता धोंगडे

तिने या व्हिडिओमध्ये निळ्या रंगाची सुंदर साडी नेसलेली दिसते. गुलालाची उधळण आणि हातात नारळ घेत ती दर्शन घेतल्याचे सांगते.

तिच्या चाहत्यांनी या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समद्ये खूप साऱ्या शुभेच्छा आणि अभिनंदन केलं आहे. ज्योतिबाच्या नावानं चांगभलं🙏 म्हणत अमृताचं कौतुकही केलं आहे.

काही फॅन्सनी कय म्हटलंय पहा – आज मी तुझी Digvijay Joshi यांच्यासोबतची तू lockdown मध्ये दिलेली मुलाखत पाहिली. खूप भारी वाटलं, ज्यांना अमृता अपुरी समजली आहे त्यांनी ती मुलाखत नक्की पाहावी. मुलाखतीअखेरीस डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत.खूप भारी 👍👍.

आता तर खरी 💯सुरुवात झाली आहे ताई तुमची जोतिबाच्या नावानं चांगभलं 🙌, Jakhale gav tuz?, Amruta tu ani tejaswini Dev vagere khup manta kay…🤷🏻, Lay bhari Amruta aata changli serial kar coolers war aani marathi movies vpqn aamala aavdel tula bagayla, Khup chan kheles game tumhi, Me Marathi bigg Boss made tumala vote ke and I’m kolapuri, शिर्डीला पण या अमृता मॅडम, Amruta tai mi khup mothi fan ahe tuzi ❤️tuzya pudhil pravasa sathi khup khup shubhecha 🙌😍.

अमृताने मिसेस मुख्यमंत्री मालिकेत मुख्य भूमिका केली होती. ही मालिका प्रचंड गाजली होती. अमृता बिग बॉस मराठीच्या ४ थ्या सीझनमध्येही दिसली होती. ती या शोमध्ये फायनल राऊंडमध्येही पोहोचली होती.

Back to top button